Advertisement

आरेत झाडांवर कुऱ्हाड, पोलिस बंदोबस्तात मेट्रो कारशेडचे काम सुरू?

मुंबई पोलिसांनी सोमवारी आरे कॉलनी परिसरात सुरक्षा दलांची तैनाती वाढवली आहे.

आरेत झाडांवर कुऱ्हाड, पोलिस बंदोबस्तात मेट्रो कारशेडचे काम सुरू?
SHARES

मुंबई पोलिसांनी सोमवारी आरे कॉलनी परिसरात सुरक्षा दलांची तैनाती वाढवली. फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) अंतर्गत नोटिसा बजावूनही तेथे आंदोलन करण्यासाठी आलेल्या दोघांना देखील ताब्यात घेतलं. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

पोलिसांनी रविवारी तबरेज सय्यद आणि जयेश भिसे यांना सीआरपीसीच्या कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली. त्यांना आरेमध्ये मेट्रो कारशेडच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी बेकायदेशीरपणे एकत्र येण्यापासून रोखले, असे वनराई पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ते म्हणाले की परिसरात वाढत्या पोलिस तैनातीसह, बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत आणि रस्ते एकतर बंद करण्यात आले आहेत किंवा मार्ग वळवले गेले आहेत.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, आरे कॉलनी परिसरात फक्त रहिवाशांना प्रवेश दिला जात आहे आणि पोलीस बाहेरून येणाऱ्या लोकांना रोखत आहेत.

आरेमध्ये आंदोलकांनी झाडे तोडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाने झाडे तोडल्यामुळे तिथल्या काही बसेस वळवण्यात आल्या आहेत.

मुंबई वाहतूक पोलिसांनी काढलेल्या पत्रकानुसार आज रात्री 12 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 दिवस पोलिसांचा बंदोबस्त कायम असणार आहे. मेट्रो-3 च्या बोगीज आरेमध्ये आणण्यासाठी कोणताही अडथळा होऊ नये यासाठी वृक्ष छटाईचं काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आरेमधील मेट्रो कारशेड ज्या ठिकाणी उभे करण्यात येणार आहे, त्याठिकाणी अद्याप वृक्षतोड करण्यात आली नसल्याची माहिती आहे. कारशेडच्या प्रस्तावित ठिकाणी असलेली झाडे अद्यापही कापण्यात आली नाहीत अथवा कोणतेही बांधकाम सुरू झाले नाही. मात्र, मेट्रोच्या बोगीज् आणणार आहेत, त्यामुळे लवकरच कारशेडचे काम सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आरेमधील जंगलात मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी राज्य सरकारने उठवली होती. त्यानंतर आरे मेट्रो कारशेडचे काम वेगाने सुरू होणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांकडून दिसू लागले होते. त्यानंतर आजपासून आरेमधील झाडे कापण्यास सुरुवात करण्यात आली. गोरेगाव ते पवईला जाणारा आरेमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त आरेमधील रहिवासींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. आरेमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.हेही वाचा

गोरेगावचा आरे रोड तात्पुरता बंद, 'हा' आहे पर्यायी मार्ग

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा