कसा कराल कचऱ्याचा पुनर्वापर?

 Mumbai
कसा कराल कचऱ्याचा पुनर्वापर?

महानगरपालिकेच्या आर दक्षिण विभागाच्या वतीने मुंबईतल्या कांदिवलीतल्या ठाकूर व्हिलेजमधील एव्हरशाइन उद्यानात कंपोस्ट मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या वेळी आर दक्षिणचे उपायुक्त साहेब राव गायकवाड यांनी या कार्यक्रमात सोसायटी आणि इमारतीतून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर कसा करावा याबाबतची माहिती दिली. येत्या काळात मुंबई शहराच्या स्वच्छतेबरोबरच कचऱ्याचा पुनर्वापर आणि आजार कसे टाळावेत याबाबत उपस्थित जनतेचं मार्गदर्शन केलं.

या आयोजनाचे मुख्य सूत्रधार वार्ड क्रमांक 24 च्या शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी भोइर होत्या. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासह प्रभाग समितीचे अध्यक्ष कमलेश यादव उपस्थित होते.

Loading Comments