Advertisement

नोव्हेंबर २०२० दशकातील दुसरा सर्वाधिक उष्ण महिना : IMD

भारतीय हवामान खात्यानं (आयएमडी) प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२० हा मुंबईतील दशकातील सर्वात उष्ण महिना होता.

नोव्हेंबर २०२० दशकातील दुसरा सर्वाधिक उष्ण महिना : IMD
SHARES

भारतीय हवामान खात्यानं (आयएमडी) प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२० हा मुंबईतील दशकातील सर्वात उष्ण महिना होता. आयएमडीनं म्हटलं आहे की, मुंबईतील किमान तापमान या नोव्हेंबरमध्ये केवळ दोन वेळा २० अंश सेल्सिअसखाली आले.

सांताक्रूझ वेधशाळेमध्ये १० नोव्हेंबरला किमान तापमान १९.२ अंश सेल्सियस आणि ७ नोव्हेंबरला १९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. दरम्यान, महिन्याच्या इतर दिवसांमध्ये किमान तापमानात २० ते २४ अंश सेल्सिअस तापमान होते.

तापमानवाढीचे आणखी पुरावे दर्शवताना सोमवारी म्हणजे ३० नोव्हेंबरला सांताक्रूझ इथं किमान तापमान २२.२ अंश सेल्सियस होते. जे सामान्यपेक्षा १.3 डिग्री सेल्सियस अधिक आहे. कुलाबा इथल्या वेधशाळेमध्ये त्याच दिवशी किमान तापमान २३.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सामान्यपेक्षा ०.६ अंश अधिक होते.

दरम्यान, सांताक्रूझ इथं सोमवारी कमाल तापमान ३४.६ अंश तर कुलाबा वेधशाळेमध्ये ३३.२ अंश नोंदवले गेले. नोव्हेंबर २०२० मध्ये सर्वाधिक तापमान १७ नोव्हेंबरला होते. जेव्हा आयएमडीमध्ये ३६ अंश तापमानाची नोंद झाली.

आयएमडी (पश्चिम विभाग) चे उपमहासंचालक के. एस होसाळीकर म्हणाले, “२००९-२०१८ या कालावधीत मुंबईत किमान तापमान १४ ते ९ अंश सेल्सिअस पर्यंत होते. नोव्हेंबरमध्ये मुंबईतील किमान तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा खाली आलं.

संपूर्ण महिन्यात हे तापमान १९ अंश सेल्सिअसच्या खाली गेलं नाही. पहाटे शहरात अजूनही आनंददायी वातावरण असते. परंतु कमाल तापमान ३४ डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले तेव्हा दिवसा अधिक उष्ण वाटू लागले.”

येत्या काही दिवसातील हवामानाप्रमाणे, आयएमडीने मध्य महाराष्ट्र, कोकण प्रदेश आणि दक्षिण द्वीपकल्प प्रदेशात या हंगामात सामान्य किंवा तुलनेनं अधिक उन्हाळा असेल.



हेही वाचा

निवार चक्रिवादळानंतर मुंबईतल्या हवेची गुणवत्ता सुधारली

मिठी नदीचा होणार कायापालट, पालिकेची चार प्रस्तावांना मंजुरी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा