Advertisement

मुंबईत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

हंगामातील आतापर्यंतच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबईत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद
SHARES

भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत शहरातील किमान तापमानात ३ अंश सेल्सिअसची घट झाली आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी, १४ डिसेंबर रोजी किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे सोमवार, १३ डिसेंबरच्या २१.६ अंश सेल्सिअसच्या तुलनेत कमी आहे. यासह, या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी नोंदवलेले तापमान देखील आहे.

सांताक्रूझ वेधशाळेत सोमवारी नोंदवलेले किमान किंवा रात्रीचे तापमानही सामान्यपेक्षा तीन अंशांनी अधिक होते. मंगळवारी किमान तापमान सामान्य होते.

दरम्यान, बुधवारी, १५ डिसेंबर रोजी, IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेनुसार किमान तापमान पुन्हा १९.५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. तर कुलाबा वेधशाळेत २०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

यासह, IMD ने या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी किमान तापमान नोंदवले आहे.

सांताक्रूझ वेधशाळेत मंगळवार आणि बुधवारी कमाल तापमान ३०.९ अंश सेल्सिअस सामान्यपेक्षा कमी होते.

४८ तासांच्या अंदाजानुसार, शहरातील किमान तापमान सामान्य किंवा जवळपास-सामान्य असेल आणि आठवड्याच्या शेवटी १६ अंश सेल्सिअसपर्यंत आणखी घसरण होईल.

IMDच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, खालच्या पातळीवर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रात्रीच्या तापमानात घट झाली.

यापूर्वी, ११ नोव्हेंबर रोजी हंगामातील सर्वात कमी किमान तापमान १९.८ अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी कमी होते.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वात कमी किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. सर्वात कमी किमान तापमानाचा विक्रम डिसेंबर १९४९ मध्ये १०.६ अंश सेल्सिअस होता.



हेही वाचा

माझगाव, कुलाब्यातील हवा जास्त प्रदूषित

राज्यातील 'या' शहरांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा