मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच, लोकल उशीरा


SHARE

गेल्या ४८ तासांपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील २४ तासांत पाऊस असाच पडत राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असा इशारा देखील देण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

नालासोपारा स्थानकातील ट्रॅकवर पाणी साचल्याने फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवण्यात आली आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराने सुरू आहे.


कारण काय?

या आधीच हवामान खात्याने बुधवारपर्यंत मुंबई महानगरात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. पश्चिम बंगालच्या खाडी क्षेत्रामध्ये दबाव वाढल्यामुळे आसपासच्या परिसरात पावसानं जोर पकडला असून मुंबई आणि मुंबईलगतच्या परिसरात तसंच उत्तर कोकणात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार पुढचे ४ दिवस जोदरात पावसाचे राहणार आहेत.


२४ तासांत किती पाऊस

गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत सरासरी १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. कुलाब्यात १५९.४ मि.मी. तर सांताक्रूझमध्ये १०८.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापैकी मुंबई शहरात १४४.४७ मि.मी., पूर्व उपनगरांत १०७.२१ मि.मी. आणि पश्चिम उपनगरांत १३१.३२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ८.५६ वाजता ३.६९ मीटर उंचीची तर दुपारी २.३० मिनिटांनी २.१२ मीटर उंचीची लाट उसळेल.

मागील २४ तासात शहरात आगीची १, झाड पडल्याच्या ४, फांदी कोसळल्याच्या २, पाणी तुंबल्याच्या ३, भिंत कोसळल्याच्या २, इमारतीचा भाग कोसळल्याच्या २ आणि इतर ८ तक्रारी नोंदवण्यात आल्या.हेही वाचा-

पावसाचे लाइव्ह अपडेट्स बघण्याची 'इथं' क्लिक करासंबंधित विषय
ताज्या बातम्या