Advertisement

४ ते ५ दिवस मुंबईत मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी

हवामान प्रसारण संस्था स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, मुंबई आणि उपनगरामध्ये येते ३ ते ४ दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

४ ते ५ दिवस मुंबईत मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी
SHARES

गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये १०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परंतु, मुंबईतील (Mumbai Rains) बहुतेक भागात पावसानं हजेरी लावली नाही. तर मुंबई आणि उपनगरामध्ये (Mumbai Monsoon) मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. सोमवार दुपारपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल अशी शक्यता देखील वर्तवली गेली होती.

हवामान प्रसारण संस्था स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, मुंबई आणि उपनगरामध्ये येते ३ ते ४ दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकूणच पावसाची तीव्रता कमी झाली आहे.

हेही वाचा : यंदा सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पावसाची शक्यता

मुंबई आणि उपनगरामध्ये २ ते ५ ऑगस्ट दरम्यान मुसळधार सरी कोसळण्याच्या शक्यता आहे. त्यादरम्यान तापमानात घट होण्याची शक्‍यता असून हवामान आल्हादायक होईल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस असेल. त्यामुळे मुंबईचे हवामान ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आल्हादायक असेल.

मुंबईत जुलैच्या सुरुवातीला पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही प्रमाणात मुंबईत तापमानात घट होऊन उकाड्याच्या त्रासापासून दिलासा मिळाला होता. त्यानंतर पावसानं विश्रांती घेतली आणि तापमानात वाढ झाली. यामुळे मुंबईत पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. 



हेही वाचा

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता

मुंबईत पावसाची विश्रांती, तापमानात काहीशी वाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा