Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

मुंबईच्या किनाऱ्याजवळ दोन बोटी भरकटल्या, ४०० हून अधिक जणांचा जीव संकटात

ताैंते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मुंबई नजीकच्या समुद्रामध्ये दोन मोठे जहाज भरकटल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईच्या किनाऱ्याजवळ दोन बोटी भरकटल्या, ४०० हून अधिक जणांचा जीव संकटात
SHARES

ताैंते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मुंबई नजीकच्या समुद्रामध्ये दोन मोठे जहाज भरकटल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी एक जहाज तेल उत्खननाचं काम करणारं असून दुसरं ‘जीएल कंट्रक्शन’च्या मालकीचं आहे. या दोन्ही जहाजावर मिळून ४०० हून अधिक जण असल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही जहाजांच्या मदतीला युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.  

हेही वाचा- Cyclone Tauktae: महाराष्ट्राला ‘तौंते’चा फटका; पंतप्रधानांचा उद्धव ठाकरेंना फोन

मुंबईजवळील बॉम्बे हायच्या समुद्रात तेल उत्खन्नासंदर्भात काम करणारी एक बोट तौंते चक्रीवादळामुळे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे भरकटली. या बोटीवर कामगार आणि इंजिनियर्स असे मिळून एकूण २७३ जण असल्याची माहिती समोर येत आहे. ही बोट जोरदार वाऱ्यांमुळे मुंबई बंदराजवळ असणाऱ्या इतर बोटींना धडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयएनएस कोच्ची ही युद्धनौका या बोटीच्या बचावासाठी पाठवण्यात आली आहे.

तर ‘जीएल कंट्रक्शन’च्या मालकीचं आणखीन एक मोठं जहाज मुंबईच्या किनाऱ्यापासून ८ मैल अंतरावर समुद्रात भरकटलं आहे. या जहाजावर एकूण १३७ जण आहेत. हे जहाज समुद्रात भरकटल्यानंतर त्यांनी मदतीसाठी मागणी केली असता नौदलाने आयएनएस कोलकाता ही युद्धनौका तातडीने त्यांच्या मदतीसाठी पाठवली आहे. 

या दोन्ही जहाजांमध्ये चारशेहून अधिकजण असल्याने त्यांना वाचवण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न केले जात आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा