Advertisement

Mumbai Rains : गुरुवारीही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

पुढे तीन तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत. ताशी ४० ते ५० किमी वेगानं वादळी वाऱ्यासह पुढचे ३ तास पाऊस पडू शकतो.

Mumbai Rains : गुरुवारीही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
SHARES

मुंबई-ठाणे-नवी मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे. गेले ३ दिवस पावसांची तुफान बॅटिंग सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्या, झाडं कोसळली तर अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं.

पुढे तीन तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत. ताशी ४० ते ५० किमी वेगानं वादळी वाऱ्यासह पुढचे ३ तास पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

गेल्या १२ तासात पडलेल्या पावसानं तर आता ४६ वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. कुलाबा वेधशाळेनं गेल्या १२ तासात २९३.८ मिमी पावसाची नोंद केली आहे. ऑगस्टमध्ये गेल्या २४ तासात पडलेल्या पावसानं उच्चांक गाठला आहे. १९७४ नंतर इतका पाऊस मुंबईत कोसळला असेल. त्यामुळे ४६ वर्षांचा रेकॉर्ड यावर्षी तोडला आहे.

कुलाबा वेधशाळेनं गेल्या १२ तासात २९३.८ मिमी पावसाची नोंद केली आहे. ऑगस्टमध्ये गेल्या २४ तासात पडलेल्या पावसानं उच्चांक गाठला आहे. १९७४ नंतर इतका पाऊस मुंबईत कोसळला असेल. त्यामुळे ४६ वर्षांचा रेकॉर्ड यावर्षी तोडला आहे.

हेही वाचा : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईला पाणीपुरवठा करणारे आणखी एक धरण भरले

हवामान खात्यानं बुधवारी सांताक्रुझमध्ये १२ तासात १०३ मिमी पावसाची नोंद केली. तर काही भागांमध्ये ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान पेडर रोड मुसळधार पावसानं खचला आहे. रस्त्यावर झाडं उन्मळून पडली असून मातीचा ढीगही रस्त्यावर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडं आणि मातीचा ढीग हटवण्यात अडथळे येत आहे.

मुंबईतील पेडर रोड वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आला असून रस्त्यावर आलेला मातीचा मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याला तडे गेल्याचंही पाहायला मिळालं.


हेही वाचा

Mumbai Rains : गेल्या १२ तासात पडलेल्या पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड

Mumbai Rains : लँडस्लाईडमुळे पेडर रोड वाहतुकीसाठी बंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा