Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

उच्च न्यायालयानं २० लाखाचा दंड ठोठावल्यानंतर जुही चावलानं दिली 'ही' प्रतिक्रिया

सोशल मीडियावर जुहीनं एक व्हिडीओ शेअर करत आपले मत मांडले आहे.

उच्च न्यायालयानं २० लाखाचा दंड ठोठावल्यानंतर जुही चावलानं दिली 'ही' प्रतिक्रिया
SHARES

दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) 5G टेक्नॉलॉजीविरोधात बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलानं (Juhi Chawla) याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयानं या याचिकेवरुन तिला फटकारत २० लाखांचा दंड ठोठावला होता.

आता आपल्या सोशल मीडियावर (Social Media) जुहीनं एक व्हिडीओ शेअर करत आपले मत मांडले आहे. सोशल मीडियावर जुहीचा हा व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे.

१ मिनिट २४ सेकंदाचा हा व्हिडीओ जुही चावलाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना जुहीनं कॅप्शनमध्ये ‘Hear’ असं लिहिलं आहे. तिच्या या व्हिडीओवर तिचे चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडीओ शेअर करताना जुही चावलानं म्हटलं आहे की, नमस्कार, काही दिवसात गोंधळ एवढा वाढला आहे की, मी स्वत:चा आवाजही ऐकू शकले नाही. मला या गोंधळात वाटलं की एक अतिशय महत्त्वाचा मेसेज कदाचित विसरलो आणि तो असा होता की आम्ही 5G विरोधात नाही. उलट आम्ही याचे स्वागत करत आहोत. तुम्ही ते नक्की आणा. आम्ही फक्त एवढेच सांगत आहोत की, 5G सुरक्षित आहे हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं.

जुही पुढे म्हणाली की, आमचं केवळ एवढंच म्हणणं आहे की या टेक्नॉलॉजीबाबत तुमचा अभ्यास, संशोधन सार्वजनिक करा, जेणेकरुन आमच्या मनात जी भीती आहे, ती निघून जाईल. आम्ही सगळे निर्धास्तपणे झोपू शकतो. आम्हाला केवळ एवढेच जाणून घ्यायचे आहे की, ही टेक्नॉलॉजी लहान मुले, गर्भवती महिला आणि जन्माला येणाऱ्या बाळांसाठी सुरक्षित आहे.

जुही चावलाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, या प्रकरणात याचिकाकर्त्यानं कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला. याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे. म्हणूनच याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली गेली. न्यायमूर्ती जीआर मिधा यांच्या खंडपीठानं आदेशात म्हटलं आहे की, हे आरोप त्रासदायक आहेत.

हायकोर्टाच्या सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला आणि बेकायदेशीरपणे सुनावणीत भाग घेतलेल्या सर्वांना न्यायालयानं अवमान नोटीस बजावली आहे. कोर्टाच्या सुनावणीत अडथळा आणल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना अशा लोकांवर कारवाई करण्यास सांगितलं आहे.

दिल्ली उच्च न्यायालयानं जुही चावलाच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारला (Government) निवेदन न देता 5G वायरलेस नेटवर्क (Wireless Network) तंत्रज्ञानाला आव्हान देण्यासाठी थेट कोर्टात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. तंत्रज्ञान संबंधित तिच्या चिंतेबाबत सरकारला कोणतंही निवेदन न देता, जुही चावला यांनी देशात 5 जी वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात थेट दावा दाखल केला.हेही वाचा

ब्लॅक फंगसच्या भितीपोटी नागरिकांची झाडांवर कुऱ्हाड, अफवा पसरवू नका

आरेकडून वन विभागास मिळाला ८१२ एकर जागेचा ताबा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा