Advertisement

मुंबईत आज पावसाची शक्यता, तापमान घसरणार

पावसामुळे येत्या दोन दिवसांनंतर राज्यातील किमान तापमानात घट होणार.

मुंबईत आज पावसाची शक्यता, तापमान घसरणार
SHARES

मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि नगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शनिवारी हलक्या पावसाची शक्यता आहे.

रविवारी देखील मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक अशा काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. 

त्यामुळे येत्या दोन दिवसांनंतर राज्यातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसनं घसरण होणं अपेक्षित आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी रविवारी पावसाची शक्यता आहे.

तसंच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. राज्यात दिवसभरात सर्वाधिक तापमानाची नोंद सांगलीत ३४.६ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान गोंदियात १०.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले.

देशाच्या उत्तर भागात सध्या पश्चिमी चक्रवात निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम हवामानावर होत असून उत्तरेकडील थंडीचा कडाका कमी झाला आहे. परिणामी राज्यातील वातावरणात बदल जाणवत आहे.  हेही वाचा

राणीच्या बागेत प्राण्याचं बारसं; एकाच 'ऑस्कर' नाव तर दुसऱ्याच 'वीरा'

... म्हणून मुंबई विद्यापीठातील ५००० झाडांना बसवला क्यूआर कोड

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा