Advertisement

६- ७ जानेवारीला मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

राज्यात ६ ते ७ जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

६- ७ जानेवारीला मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
SHARES

राज्यात ६ ते ७ जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसंच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या ३ ते ४ दिवसांत घट होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि ठाणे इथे किमान तापमान १६-१८ च्या आसपास असेल. तर नाशिक, पुणे इथं १४-१६ अंश सेल्सिअस तापमान असेल.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, दिल्ली, पलवल, होडल (हरियाणा), नदबाई, नगर, डीग, लक्ष्मणगड, भरतपूर, मेहंदीपूर बालाजी (राजस्थान), बरसाना, नंदगाव, खतौली, गलाउटी, छपरौला येथे पुढील दोन ते तीन तासांत मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि उपनगरात सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रविवारी सकाळी दिल्लीत हलक्या सरींचा पाऊस झाला. पावसामुळे दिल्लीत धुरके नाही, परंतु थंडी वाढलीय. 

दिल्लीत पहाटे ११.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत पाऊस पडला. हवामान खात्याच्या माहितीनुसार दिल्लीतील सफदरजंग भागात ६.६ मिमी, पालममध्ये १.५ मिमी, लोधी रोडला ८ मिमी आणि आयनगरमध्ये ६ मिमी पाऊस पडला.

सध्या पश्चिमेकडून येणारे बााष्पयुक्त वारे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण करत आहेत. भारतीय हवामान खात्यानं देशातील अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय. जम्मू-काश्मीरमधून सपाट भागात हलक्या सरींचा पाऊस आणि बर्फवृष्टी दिसून आली. लडाख प्रदेशातील हवामान कोरडेच राहिले.



हेही वाचा

थंडित पावसाचा अनुभव, मुंबई ठाण्यासह उपनगरात पाऊस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा