Advertisement

थंडीत पावसाचा अनुभव, मुंबई ठाण्यासह उपनगरात पाऊस


थंडीत पावसाचा अनुभव, मुंबई ठाण्यासह उपनगरात पाऊस
SHARES

नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. थंडी आणि पाऊस असे दोन्ही अनुभव एकत्र आले आहेत. 

इस्टर्न एक्सप्रेसवेवर देखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. पुढचे ४८ तास तापमानात आणखी घट होणार आहे. १८ अंश सेल्सियस इतकं तापमान खाली जाऊ शकतं, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  

मुंबईतल्या पावसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी फोटो ट्विट करत पावसाची माहिती दिली आहे. 

पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार ६ आणि ७ जानेवारीला पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पाऊस होऊ शकतो.

तर राज्यात काही ठिकाणी ढगाळ तर विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सध्या मुंबईत १९ ते २१ अंश सेल्सियस तापमान आहे. येत्या आठवड्यात दोन ते तीन डिग्रीनं आणखीन खाली उतरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर भारतात देखील शनिवारी आणि रविवारी रात्री काही भागांमध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावली होती. वातावरणातील बदलत्या हवामानामुळे पिकांचं नुकसान होईल अशी चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.



हेही वाचा

मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात

राणीच्या बागेत घुमणार सिंहाची डरकाळी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा