Advertisement

झाडे टिकवून ठेवण्यासाठी ना-फेरीवाला क्षेत्र


झाडे टिकवून ठेवण्यासाठी ना-फेरीवाला क्षेत्र
SHARES

मुंबई हरित आणि सुंदर रहावी यासाठी 1998 साली मुंबई महानगरपालिकेने अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट(एएलएम)ची स्थापना केली. यातूनच मुंबईमध्ये 276 एलएलएम सुरू करण्यात आले. याचाच एक भाग आहे माहिममधील शीतलादेवी सिटीझन फोरम. या फोरमचा जन्म 2003 साली झाला. या माध्यमातून माहिममधील परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले. सध्या या एएलएमच्या भागात 28 गृहनिर्माण सोसायट्या,3 वाड्या आणि जवळपास 10 हजार लोकवस्तीचा परिसर येतो. त्यामुळे येथे कचऱ्याचे साम्राज्य असणेही स्वाभाविकच आहे. येथील लोकसंख्य़ेच्या तुलनेत 4 लाख 50 हजार किलो कचरा पालिकेकडून दररोज उचलला जातो.

विशेष म्हणजे शितलादेवी सिटीझन, माहीमच्या वतीने झाडे लावण्यावरही भर देण्यात आले आहे. याचा एक भाग म्हणून जवळपास या परिसरात 200 हून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. ती झाडे टिकून रहावी यासाठी खास काळजी घेतली जाते. त्यासाठी हा परिसर ना-फेरीवाला क्षेत्र बनवण्यात आला आहे. ना-फेरीवाला क्षेत्र बनवायचे खास कारण म्हणजे, फेरीवाल्यांकडून येथे कचरा टाकला जायचा. त्यामुळे हा परिसर आम्ही ना-फेरीवाला क्षेत्र बनवल्याची माहिती एएलएमचे सदस्य दिनेश भंडारे यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा