Advertisement

पुढचे २ महिने प्रचंड उकाडा, हवामान खात्याचा अंदाज

पुढील २ महिन्यातील कमाल तापमान (maximum temperature) हे सरासरीपेक्षा अधिकच असेल असं हवामान खात्याने (Meteorological Department) म्हटलं आहे.

पुढचे २ महिने प्रचंड उकाडा, हवामान खात्याचा अंदाज
SHARES

फेब्रुवारी महिन्यातील उकाड्याने (heat) सर्वच जण हैरान झाले आहेत. थंडी पळाल्याने उकाडा चांगलाच वाढला आहे. पण पुढचे २ महिने मोठा उकाडा सहन करावा लागणार आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात प्रचंड उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील २ महिन्यातील कमाल तापमान (maximum temperature) हे सरासरीपेक्षा अधिकच असेल असं हवामान खात्याने  (Meteorological Department) म्हटलं आहे. देशाच्या मध्य, पूर्व आणि पश्चिम भागाला तीव्र उष्णतेचा (heat) सामना करावा लागेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जून महिन्यापर्यंत अल निनोचा प्रभाव जाणवत होता. ही तापमानवाढ त्याचाही परिणाम असू शकतो असं हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

फेब्रुवारी महिन्यात काही दिवस थंडी पडली. मात्र, त्यानंतर थंडी जाऊन उकाडा वाढला. हा उकाडा असाच वाढत राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. पुढचे दोन महिने सरासरी कमाल तापमानापेक्षा (maximum temperature) तापमान हे एक ते दीड डिग्री सेल्सियसने जास्त असेल. विशेष करून मध्य भारताला उष्णतेची (heat)  झळ अधिक सोसावी लागणार आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, रायलसीमा, तमिळनाडू या राज्यांमध्ये कमाल तापमान हे सरासरीपेक्षा ०.५ ते १ डिग्री सेल्सियसने जास्त असेल. तर महाराष्ट्राचा काही भाग, राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा, चंदीगड दिल्लीमध्ये तापमान १ ते १.५ डिग्री सेल्सियसने जास्त असेल.


हेही वाचा -

मुंबईतील हवा अधिक दूषित, वांद्रे आणि नवी मुंबईचा पहिला नंबर

एलबीएस मार्ग होणार १०० फुटांचा, ७९ बांधकामं पाडली
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा