Advertisement

Good News: यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार

देशभरात सध्या तापमानानं उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत सोमवारी हवामान खात्यानं बळीराजा आणि नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी दिली.

Good News: यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार
SHARES

देशभरात सध्या तापमानानं उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थितीत सोमवारी हवामान खात्यानं बळीराजा आणि नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी दिली. यावर्षी देशभरात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.


परवानगीनंतर अंदाज जाहीर

सध्या देशभरात निवडणुकीचं वातावरण असून आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. त्यामुळं सोमवारी निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन हवामान खात्यानं आपला अंदाज जाहीर केला. यापूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेनं यावर्षी मॉन्सूनवर अल निनोचा प्रभाव पडणार असल्याची माहिती दिली होती. परंतु भारतीय हवामान खात्यानं अल निनोचा प्रभाव कमी होणार असून मॉन्सूनच्या अखेरपर्यंत तो सरासरी गाठणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.


सरासरीपेक्षा कमी पाऊस

गेल्या वर्षी हवामान खात्यानं ९७ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. परंतु त्यावर्षी सरासरीच्या ९१ टक्के पाऊस पडला होता. तर देशातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता हवामान खात्याच्या अंदाजानंतर सर्वांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

बोरीवली, मालाड परिसरात अवकाळी पाऊस

धारावीत इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू, ३ जण जखमी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा