Advertisement

२४ जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्र व्यापणार, हवामान खात्याचा अंदाज


२४ जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्र व्यापणार, हवामान खात्याचा अंदाज
SHARES

येत्या २१ जून पर्यंत मान्सून कोकणात येईल तसंच २४ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.    

अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाट मोकळी झाली आहे. मान्सूनचे ढग कर्नाटकमध्ये पोहोचले असून महाराष्ट्रात २ ते ३ दिवसांत त्यांचं आगमन होऊ शकतं, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. 

केरळमध्ये १ जूनला पाऊस अपेक्षित असताना तिथं मोसमी वारे उशिरा पोहोचले. त्यातच चक्रीवादळाने मोसमी वाऱ्यांची वाट रोखली. त्यामुळे १३ ते १४ जूनला महाराष्ट्रात पडणारा पाऊस लांबणीवर गेला. परंतु चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या प्रवासासाठी वाट मोकळी झाली आहे.  

त्यानुसार कर्नाटकातील मंगळुरू, म्हैसूर, तामीळनाडूतील सालेम आणि कुड्डालोर, त्रिपुरा, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात पोहोचलेला पाऊस ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.



हेही वाचा-

चर्चगेट स्थानकावरही स्ट्रक्चरल ऑडिटची वेळ!

मालाडमध्ये झाडाची फांदी कोसळून ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा