Advertisement

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली, 'या' दिवशी पावसाचा अंदाज

१५ फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली, 'या' दिवशी पावसाचा अंदाज
SHARES

१५ फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. अत्यंत खराब श्रेणीतून मध्यम श्रेणीत अशी हवेची गुणवत्त नोंदवण्यात आली आहे.

सिस्टम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR)च्या मते, मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १५९ नोंदवला आहे. पुढील दोन दिवस हेवेची गुणवत्ता मध्यम वर्गात राहण्याचा अंदाज आहे.

१२ फेब्रुवारी रोजी, मुंबईत AQI ३२२ होता. ३००-४०० दरम्यानचा AQI अत्यंत हानिकारक मानला जातो. ५१-१०० AQI समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० खराब आणि ३०१-४०० अत्यंत खराब मानला जातो. ४०० पेक्षा जास्त AQI असेल जास्त गंभीर मानला जातो.

दरम्यान मुंबई आणि कोकण परिसर वगळता राज्यातील इतर भागांत १६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात १६ फेब्रुवारीपासून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात वाढ होऊन ते १६ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १८ फेब्रुवारी रोजी आकाश सामन्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार १६ ते १८ फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर वादळी पाऊस होऊ शकतो.

१६ तारखेला पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील पूर्व भागांत वादळी पावसाचा अंदाज आहे. १७ तारखेला विदर्भासह, मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे.

१८ तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही.

१९ तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील. परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल आणि २० तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.



हेही वाचा

नवी मुंबई सायक्लॉथॉन २८ फेब्रुवारीला

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडमुळे १५८० कोटी रुपये वाचणार, समितीचा अहवाल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा