Advertisement

मुंबईतल्या उकाड्यामागं 'हे' कारण!

यंदा मार्चच्या मध्यापासूनच मुंबईत उकाड्याला सुरूवात झाली असून एप्रिलमध्ये उकाडा प्रचंड वाढला आहे. हवामान खात्यानं दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी उकाड्यात वाढ होऊन तापमान ३५ अंशाांपर्यंत जाईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानुसार मंगळवारचा दिवस मुंबईकरांसाठी हाॅट ठरला आहे. उकाड्यानं आणि घामानं मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत.

मुंबईतल्या उकाड्यामागं 'हे' कारण!
SHARES

मुंबईकरांसाठी मंगळवारचा दिवस घामाघूम करणारा आणि उकाड्यानं हैराण करणारा ठरला आहे. मंगळवारी मुंबईतील पारा ३३ अंशांच्या वर गेला असून या वाढत्या आर्द्रतेचा चांगलाच फटका मुंबईकरांना बसत आहे. एवढंच नाही, तर पुढच्या ४८ तासात पारा ३५ अंशांवर जाणार असल्याची माहिती हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकारी अजय कुमार यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

तापमान ३५ अंशावर जाणार

यंदा मार्चच्या मध्यापासूनच मुंबईत उकाड्याला सुरूवात झाली असून एप्रिलमध्ये उकाडा प्रचंड वाढला आहे. हवामान खात्यानं दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी उकाड्यात वाढ होऊन तापमान ३५ अंशाांपर्यंत जाईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानुसार मंगळवारचा दिवस मुंबईकरांसाठी हाॅट ठरला आहे. उकाड्यानं आणि घामानं मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत.

उकाड्याचं कारण काय?

अरबी समुद्राकडून उत्तर-दक्षिण असे वाहणारे वारे सध्या उत्तरेकडून वाहत आहेत. त्यामुळे हवेत प्रचंड आर्द्रता निर्माण झाली आहे, परिणामी पारा फार वाढला नसला, तरी आर्द्रतेमुळे प्रचंड उकाडा जाणवत असल्याचं अजय कुमार यांनी स्पष्ट केलं. पुढच्या ४८ तासातही मुंबई तापलेलीच राहिलं असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान मुंबईकरांनी दुपारच्या वेळेस गरज असेल, तरच बाहेर पडावं, बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी आणि भरपूर पाणी प्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

हेही वाचा-

उन्हात बाहेर पडताना घ्या 'ही' काळजी!

उष्णतेमुळे पोटाच्या विकारांमध्ये वाढ, स्ट्रीट कोल्ड्रिंक्समुळे सर्वाधिक धोका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा