Advertisement

मुंबईत पावसानं मोडला २६ वर्षातला विक्रम

मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसाने २६ वर्षांचा विक्रम मोडला आहे. सप्टेंबर महिन्यात २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच २४ तासांमध्ये मुंबईत एवढा पाऊस पडला आहे.

मुंबईत पावसानं मोडला २६ वर्षातला विक्रम
SHARES

मुंबईत मंगळवारपासून तब्बल २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाची गणना अतिवृष्टीमध्ये केली जाते. मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसाने २६ वर्षांचा विक्रम मोडला आहे. सप्टेंबर महिन्यात २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच २४ तासांमध्ये मुंबईत एवढा पाऊस पडला आहे.

१९९४ ते २०२० या कालावधीत सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा एका दिवसात मुंबईत इतका पाऊस पडला. त्याचबरोबर १९७४- २०२० दरम्यान सप्टेंबर महिन्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून  जोरदार पाऊस सुरु झाला. हा पाऊस पहाटे साडेपाचपर्यंत सुरु होता. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला. 

मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी ५. ३० पर्यंत मुंबईत २८६.४ मिमी पाऊस पडला. पावसाची  दक्षिण मुंबईत म्हणजेच कुलाब्यात १४७.८ मिमि पाऊस पडला. तर, मंगळवारी संध्याकाळी ५.३० ते ११.३० या सहा तासांच्या कालावधीत मुंबईत १०७ मिमी तर रात्री ११.३० ते ५.३० या सहा तासांमध्ये दक्षिण मुंबईत ८९ मिमी पावसाची नोंद झाली.

भारतीय हवामान खात्यानुसार, १५.६ मिमी ते ६४.४ मिमी पाऊस हा मध्यम स्वरुपाचा, ६४.५ मिमी ते ११५.५ मिमी पाऊस मुसळधार तर ११५.६ मिमी ते २०४.४ मिमी पाऊस हा अती मुसळधार म्हणून गणला जातो. त्याचप्रमाणे २०४ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद अतीवृष्टी म्हणून केली जाते.



हेही वाचा-

 Mumbai Rains मुसळधार पावसामुळं रेल्वे वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रद्द

 मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक रस्ते, स्टेशन जलमय



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा