Advertisement

मुंबईसह अजुबाजूच्या परिसरात जोरदार पावसाचा इशारा


मुंबईसह अजुबाजूच्या परिसरात जोरदार पावसाचा इशारा
SHARES

मुंबईत मंगळवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबईत पावसाची संततधारा सुरु असून, मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह सभोवतालच्या परिसरात ढगांची गर्दी झाल्याचे रडार व सॅटेलाइट इमेजेच्या माध्यमातून दिसत आहे.

दक्षिण कोकणचा भागही ढगांनी व्यापला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी दोन वाजेपर्यंत मागील ६ तासात ४० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

कोकण विभागातील बहुतांश भागात पुढील ३ ते ४ दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे कोकण विभागांतील सर्वच भागांत आणि प्रामुख्याने मुंबई, ठाणे परिसरात अतिवृष्टी झाली.

अनेक ठिकाणी २४ तासांत २०० ते ३०० मिलिमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने दिलासा दिला. या भागांत शेतीसाठी उपयुक्त पाऊस झाला आहे.हेही वाचा -

Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णयRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा