Advertisement

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. मंगळवारी कशी असेल पावसाची दिशा जाणून घ्या.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी
SHARES

हवामान खात्याकडून मान्सूनसंदर्भात महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आहेत. २७ जून रोजी म्हणजेच मंगळवारी राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याच्या अंदानुसार, पुढच्या २४ तासांमध्ये नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्येदेखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याचा इशारा आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे २७ आणि २८ जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आगे.

दरम्यान, २९ आणि ३० जूनला महाराष्ट्रात तुफान पाऊस होईल. पण यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २७ जून रोजी राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो.



हेही वाचा

28 जूनची बकरी ईदची सुट्टी रद्द, नवीन तारीख जाहीर

फ्रीज, फर्निचर मोगरा नाल्यात अडकून, ...म्हणून आला पूर : BMC

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा