Advertisement

मुंबई कुडकुडली हो! तापमान १३ अंशांवर!

मागील आठवड्याभरापासून राज्यात थंडीची लाट असून, मुंबईत खाली घसरलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकरही चांगलेच गारठले आहेत.

मुंबई कुडकुडली हो! तापमान १३ अंशांवर!
SHARES

उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला असतानाच राज्यातही कमालीची थंडी पडली आहे. विशेषत: मागील आठवड्याभरापासून राज्यात थंडीची लाट असून, मुंबईत खाली घसरलेल्या किमान तापमानामुळे मुंबईकरही चांगलेच गारठले आहेत.


तापमान मोसमातील किमान पातळीवर

रविवारी मुंबईतील तापमानाने मोसमातील किमान मर्यादा गाठली. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार रविवारी मुंबईतील किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले. यामुळे अनेक ठिकाणी मुंबईकर रविवारच्या दिवशी सुट्टीची मजा लुटण्याऐवजी स्वेटर घालून घरीच आराम करणं पसंत करताना दिसत होते.


सांताक्रूझ सर्वात थंड!

मुंबईतील सांताक्रूझ येथील कमाल तापमान रविवारी २९. ६ तर किमान तापमान १३. ८ इतके नोंदवले गेले. तर कुलाबा येथील तापमानाची कमाल नोंद २९ अंश सेल्सिअस आणि किमान १७.५ इतकी नोंदवली गेली.


पंधरवड्यात थंडी कायम राहणार

येत्या पंधरवड्यात विशेषत: सकाळी आणि रात्री वाहत असलेल्या गार वाऱ्यांमुळे मुंबईच्या थंडीत आणखीन भर पडणार आहे. जानेवारीमध्ये मुंबईतील किमान तापमान साधारणत १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरत असल्याचा अनुभव आहे. २९ जानेवारी २०१२ रोजी नोंदले गेलेले १० अंश सेल्सिअस तापमान हे गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी तापमान होते.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा