Advertisement

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

येत्या १२ तासांत या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
SHARES

कोरोना व्हायरसचं एक संकट आधीच असताना आता आणखी एक संकट येणार आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, ललितपूर, नागपूर, नांदेड, हिंगोली, नंदुरबार, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या १२ तासांत या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.


शेतकरी चिंतेत

गुरुवारी कोकण किनापट्टीलगच्या काही भागांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. नाशिकमधील मनमाड शहर परिसरात अवकाळी पावसाचे जोरदार आगमन झालं. बदलत्या हवामानामुळे बागायतदार शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याची चिंता आहेच. आधीच कोरोनामुळे व्यवसायात समस्या निर्माण झाल्या असताना आता अवकाळी पावसामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.


१२ तासांत मुसळधार पाऊस

स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजनानुसार महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये येत्या १२ तासांत मुसळधार पाऊस प़डणार आहे. बंगालकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानत वेगानं बदल होत आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक बदल होत आहेत. त्यामुळे येत्या काळातील वातावरणातील वेगानं बदल होतील अशी शक्यता हवामान विभागनं वर्तवली आहे.


ढगाळ वातावरण

बदलापूर, लोणावळा आणि मुंबईच्या काही भागांमध्ये हलका पाऊस पडल्याचं सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुंबईत पावसाची थोडीशी शक्यता आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये नागरिकांना ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.


किमान तापमानाची नोंद

गुरुवारी मुंबईत १० वर्षातील सर्वाधिक किमान तापमान नोंदवलं गेलं. सांताक्रूझ हवामान खात्यानं नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, किमान तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. जे या क्षेत्रातील नेहमीच्या किमान तपमानापेक्षा ४ अंश जास्त आहे.

कुलाब्यातील वेधशाळेमध्ये सामान्य तापमानापेक्षा किमान तापमानात १.८ अंशांची वाढ दिसून आली. तथापि, येत्या काही दिवस ढगाळ वातावरणामुळे स्थानिकांना थोडासा दिलासा मिळणारा आहे.



हेही वाचा

मुंबईच्या हवेचा गुणवत्ता स्तर उंचावला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा