Advertisement

मुंबईत सर्वात कमी तापमानाची नोंद

सोमवारी म्हणजेच ७ डिसेंबर रोजी, मुंबई हवामान खात्याच्या (आयएमडी) सांताक्रूझ वेधशाळेतील किमान तापमानात घट झाल्याचं म्हटलं.

मुंबईत सर्वात कमी तापमानाची नोंद
SHARES

सोमवारी म्हणजेच ७ डिसेंबर रोजी, मुंबई हवामान खात्याच्या (आयएमडी) सांताक्रूझ वेधशाळेतील किमान तापमानात घट झाल्याचं म्हटलं. किमान तापमान १७.८ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे.

गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट होत आहे. सोमवारचे किमान तापमान रविवारी १८ अंश सेल्सियस होते. तर शनिवारी १८.४ डिग्री सेल्सिअसपेक्षा किरकोळ होते. शिवाय, कुलाब्यात किमान तापमान २२.४ अंश होते. तर  दुसरीकडे कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

२०१९ मध्ये ५ डिसेंबर रोजी मुंबईत २३.३ अंश सेल्सिअस तापमान होते. जे २ डिसेंबर २०१३ रोजी नोंदवण्यात आलेल्या किमान तापमानाच्या बरोबरीनं होतं. दोन्ही सध्या दहा वर्षांत सर्वाधिक आहे. १ डिसेंबर २००८ रोजी मुंबईत २५.२ अंश सेल्सिअस तापमान होते. अन्य वर्षांमध्ये, २००९ ते २०१८ या काळात सर्वाधिक किमान तापमान २०.८ ते २३.६ अंश सेल्सिअस दरम्यान होते.

दरम्यान, मंगळवारी, १ डिसेंबर रोजी, AQI दोन दिवसांच्या समाधानकारक हवा गुणवत्तेनंतर ११८ च्या मध्यम श्रेणीत दाखल झाला. वृत्तानुसार, वरळी शहरात सर्वात स्वच्छ हवा होती. ७६ अंश सेल्सियस तापमान, वाढले असले तरी शांत वारा यांच्यासह पूर्वेकडील वाऱ्यांनी वाहून घेतलेल्या धुळीमुळे प्रदूषणात किरकोळ वाढ झाली.

१०० किंवा त्यापेक्षा कमी असलेली एक्यूआय मूल्ये सहसा समाधानकारक मानली जातात. तथापि, जेव्हा एक्यूआय मूल्ये १०० च्या वर असतात तेव्हा हवेची गुणवत्ता खराब असते. २०१ ते ३०० पर्यंतचा AQI वायू खूपच धोकादायक मानला जातो. दम्याचा त्रास आणि हृदय किंवा फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांनी बाहेर जाणं टाळलं पाहिजे.Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा