Advertisement

प्रदूषणामध्ये मुंबई जगात दुसऱ्या क्रमांकावर, दिल्लीलाही टाकले मागे

स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स IQAir ने डेटा जारी केला

प्रदूषणामध्ये मुंबई जगात दुसऱ्या क्रमांकावर, दिल्लीलाही टाकले मागे
File photo
SHARES

प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे. स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स (IQAIR) च्या नवीन यादीनुसार, लाहोर पहिल्या क्रमांकावर आहे, तर काबूल तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स हा रिअल-टाइम एअर क्वालिटी मॉनिटर आहे. त्यानुसार 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या आठवडाभरात मुंबई हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. 29 जानेवारी रोजी, मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात वाईट शहराच्या क्रमवारीत 10 व्या क्रमांकावर आहे.

29 नंतर येथील वातावरणातील प्रदूषण आणखी वाढले, त्यानंतर 2 फेब्रुवारीला मुंबई सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. 13 फेब्रुवारी रोजी मुंबईने सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळख असलेल्या दिल्लीलाही मागे टाकले आणि आता ते जगातील दुसरे सर्वात प्रदूषित शहर बनले आहे.

सीपीसीबीच्या म्हणण्यानुसार, यावेळी मुंबईतील प्रदूषणाच्या बाबतीत बीकेसी अव्वल आहे, तर देवनार दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर अंधेरी परिसर आहे. बीकेसीतील बांधकामांमुळे धूळ प्रदूषणाचे स्रोत आहे, तर देवनारमध्ये डम्पिंग ग्राउंड, रासायनिक कारखाने आणि बायोमेडिकल वेस्ट ट्रिटमेंट प्लांट प्रदूषणाचे स्रोत आहेत. त्याचप्रमाणे अंधेरीत प्रदूषण वाढण्यास औद्योगिक कारखाने कारणीभूत आहेत.

जगातील टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित शहरे (क्रमांकानुसार)

  • लाहोर, पाकिस्तान)
  • मुंबई, भारत)
  • काबुल, अफगाणिस्तान)
  • काओशुंग, तैवान)
  • बिश्केक (किर्गिस्तान)
  • अक्रा, घाना)
  • क्राको (पोलंड)
  • दोहा (कतार)
  • अस्ताना (कझाकस्तान)



हेही वाचा

राज्यातील तापमानात 15 फेब्रुवारीनंतर वाढ होणार

BMC Budget 2023-24: मुंबईतल्या 'या' 5 गजबजलेल्या भागात एअर प्युरिफायर उभारणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा