आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उघड केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या पावसाळ्याच्या चार महिन्यांत मुंबईत अरबी समुद्रात २२ दिवस भरती असेल.
पुढे त्यांनी स्पष्ट केलं की, जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी पाच दिवस भरतीचे दिवस असतील.
मंगळवार, १९ एप्रिल रोजी सीएसएमटी इथल्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (DDMA) आढावा बैठकीत यावर चर्चा झाली.
बैठकीत प्रशासकिय संस्था आणि इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अहवालानुसार, १६ जून आणि १५ जुलै रोजी अनुक्रमे १.३५ आणि १.२२ च्या सुमारास सर्वाधिक ४.८७ मीटरची भरती अपेक्षित आहे. ४.५ मीटरपेक्षा जास्त भरतीची पातळी धोकादायक असते कारण त्यामुळे सखल भागात मुसळधार सरी आल्यास पूर येऊ शकतो.
जूनमध्ये, मुंबईत १३-१८ जून, १३-१८ जुलै, ११-१५ ऑगस्ट आणि ९-१३ सप्टेंबर या कालावधीत समुद्र-पातळी वाढेल.
शिवाय, मुंबईकरांसाठी एक स्वागतार्ह बातमी म्हणजे, यंदा मान्सून सामान्य असेल आणि जूनमध्ये नेहमीप्रमाणे पावसाचं आगमन होईल. पालिकेनं सांगितलं की, त्यांनी शहरातील नाल्यांचे गाळ काढणे आणि रस्त्यांची स्थिती सुधारण्याची कामे सुरू केली आहेत.
समुद्राची पातळी ४.५ मीटरपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईला यावर्षी जास्त धोका असेल. गेल्या पावसाळ्यात शहरात १८ दिवस समुद्राच्या पातळीत वाढ झाली होती. ४ जून आणि ३ जुलै रोजी ४.८७ मीटरपर्यंतची सर्वोच्च भरती दिसून येईल.
याशिवाय भूस्खलन होणाऱ्या भागात राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की ७२ ठिकाणे भूस्खलन-प्रवण क्षेत्र म्हणून ओळखली गेली आहेत. त्यापैकी ४५ धोकादायक म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पालिका अशा भागात राहणाऱ्या लोकांना नोटीस पाठवण्यास सुरुवात करेल. त्यांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगेल. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित सर्व विभागांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा