Advertisement

जॉगिंग नाही, आता प्लॉगिंग करा!

सर्व प्रथम स्वीडनमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला स्वीडनमध्ये प्लॉगिंग असं नाव देण्यात आलं. हा शब्द 'जॉगिंग' आणि 'पिकअप' या दोन इंग्रजी शब्दांनी तयार झाला आहे. यामध्ये लोकांनी सकाळी धावताना अथवा चालताना आपल्या हातात एखादी बॅग घ्याची. धावता धावता जो काही कचरा अथवा प्लॅस्टिक दिसेल ते बॅगेत टाकायचे.

जॉगिंग नाही, आता प्लॉगिंग करा!
SHARES

राज्य सरकारनं लागू केलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आलं. पण देश स्वच्छ ठेवणं, ही फक्त सरकारचीच नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे, असं मत ठाण्यात राहणाऱ्या तरूण कुमार गौतमचं आहे. ४४ वर्षीय तरूण कुमार भारतीय वायूसेनेत कार्यरत होता. वायू सेनेतून निवृत्त होत तरूणनं स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. राज्य सरकारच्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयापासून प्रेरित होत तरूण लवकरच ठाण्यात 'प्लॉगिंग' ही मोहीम सुरू करणार आहे.


प्लॉगिंग म्हणजे काय?

सर्व प्रथम स्वीडनमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला स्वीडनमध्ये प्लॉगिंग असं नाव देण्यात आलं. हा शब्द 'जॉगिंग' आणि 'पिकअप' या दोन इंग्रजी शब्दांनी तयार झाला आहे. यामध्ये लोकांनी सकाळी धावताना अथवा चालताना आपल्या हातात एखादी बॅग घ्याची. धावता धावता जो काही कचरा अथवा प्लॅस्टिक दिसेल ते बॅगेत टाकायचे.


प्लॉगिंग मोहिमेला ठाण्यातून सुरुवात

तरूण कुमार गौतमच्या अर्थकाईंड ह्युमॅनिटी या संस्थेनं ठाण्यात पहिल्यांदाच प्लॉगिंग ही मोहीम आयोजित केली आहे. १ एप्रिल २०१८ पासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. येऊर गेट ते पाटणपाडा या भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. अर्थकाईंड ह्युमॅनिटी या संस्थेचे जवळपास ५० स्वयंसेवक या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत.



प्लॉगिंग ही मोहीम परिणामकारक आहे. पण भारतात ही मोहीम जास्त काळ टिकू शकली नाही. कारण भारतीय लोकांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी माझ्या अनेक मित्रांना धावता धावता कचरा उचलण्याची संकल्पना सांगितली. पण ते त्यासाठी उत्साही नव्हते. सो या संकल्पनेला मी वेगळ्या पद्धतीनं मांडायचं ठरवलं. माझ्या अर्थकाईंड ह्युमॅनिटी संस्थेच्या मदतीनं प्लॉगिंग हा इव्हेंट मी आयोजित केला. सामाजिक कार्य आणि स्वच्छता यामध्ये रुची असलेल्यांनाच मी या मोहिमेत सहभागी करून घेतलं. याशिवाय या मोहिमेत लाफ्टर थेरेपी, योगा, डान्स आणि बरंच काही अनुभवता येणार आहे. फक्त ३ ते ४ तास तुम्हाला यासाठी द्यावे लागणार आहेत.  

तरूण कुमार गौतम


प्लॉगिंग मोहिमेचे फायदे

प्लॉगिंग मोहिमेचे दोन फायदे आहेत. यामध्ये शहरातील कचरा उचलला जाणार आहे. त्यासोबतच व्यायाम देखील होणार आहे. काही वजन घेऊन जॉगिंग केल्यास ते शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी लाभदायी ठरते. प्लॉगिंग मोहिमेअंतर्गत जमा केलेला कचरा बॅगेत घेऊन धावावं लागणार आहे.

प्लॉगिंग या स्वच्छता मोहिमेला २०१६ साली सुरुवात झाली. मात्र तेव्हा या मोहिमेबद्दल लोकांमध्ये म्हणावी तितकी जागरूकता नव्हती. मात्र आता या मोहिमेत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत आहेत.तुम्ही देखील प्लॉगिंग या मोहिमेसाठी उत्सुक असाल, तर नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. आतापर्यंत 98 जणांनी नोंदणी केली आहे. प्लगिंगचे ही मोहीम निश्चितपणे समाजात आणि वातावरणात बदल घडवून आणेल, असा विश्वास तरूण गौतम यांना आहे.



हेही वाचा

ना सरकार, ना प्रशासन.. त्यानेच सुरू केली स्वच्छता मोहीम!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा