Advertisement

मुंबई होणार Cool, रात्रीचा पारा घसरणार

किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

मुंबई होणार Cool, रात्रीचा पारा घसरणार
SHARES
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान 18 ते 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. त्यामुळे रात्री मुंबईकरांना थंडी जाणवेल. 

खरंतर, मुंबईकर थंडीची वाट पाहत असले तरी दमट उष्माचाही रोज सामना करावा लागतो. उपनगरातील किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहिलं. 

प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12, 13 आणि 14 डिसेंबर रोजी रात्रीचे तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. तर 15 आणि 16 डिसेंबरला तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. हवामान खात्याचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितलं की, उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होईल, त्यामुळे रात्रीचे तापमान कमी होईल.

मुंबईकरांना रात्री उष्णतेपासून दिलासा मिळेल. मात्र, दिवसा तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान तज्ज्ञ राजेश कपाडिया यांनी सांगितले की, आर्द्रता 65 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. मुंबईकरांना आर्द्रतेपासून दिलासा मिळेल. मात्र, रात्रीचे तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.



हेही वाचा

दहिसरमध्ये मॅनग्रोव्ह पार्क आणि इको-टूरिझम सेंटर सुरू होणार

वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी BMCची 'अँटी स्मॉग गन' खरेदी करणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा