Advertisement

एनडीआरएफच्या ५ तुकड्या तैनात- विजय वडेट्टीवार

मागील ४८ तासांपासून मुंबई, ठाणे, पालघर परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या उद्देशातून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या ५ तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

एनडीआरएफच्या ५ तुकड्या तैनात- विजय वडेट्टीवार
SHARES

मागील ४८ तासांपासून मुंबई, ठाणे, पालघर परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या उद्देशातून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या ५ तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व  पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. याप्रसंगी नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरीच राहण्याचं आवाहन देखील वडेट्टीवार यांनी केलं आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

मंगळवारपासून मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे, काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेलं आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरीच राहावं. या संपूर्ण परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या ५ तुकड्यादेखील तैनात करण्यात आल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. (ndrf team ready for mumbai rains says vijay wadettiwar)

हेही वाचा - मुंबईची तुंबई करून दाखवली, दरेकरांचा शिवसेनेला टोला

मुंबईत मंगळवारपासून तब्बल २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसाने २६ वर्षांचा विक्रम मोडला आहे. सप्टेंबर महिन्यात २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच २४ तासांमध्ये मुंबईत एवढा पाऊस पडला आहे. १९९४ ते २०२० या कालावधीत सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा एका दिवसात मुंबईत इतका पाऊस पडला. त्याचबरोबर १९७४- २०२० दरम्यान सप्टेंबर महिन्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेला जोरदार पाऊस बुधवार सकाळपर्यंत सुरुच होता. 

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमडली. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली. 

संबंधित विषय