Advertisement

प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशिनच्या मदतीनं पश्चिम रेल्वे महसूल जमवणार

रेल्वेला प्रवाशांनी वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांची व्हिलेव्हाट लावण्याचा मार्ग सापडला आहे.

प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशिनच्या मदतीनं पश्चिम रेल्वे महसूल जमवणार
SHARES

रेल्वेला प्रवाशांनी वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांची व्हिलेव्हाट लावण्याचा मार्ग सापडला आहे. आता संपूर्ण शहरातील रेल्वे स्थानकांवर लवकरच प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग मशीन वापरून बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एक चांगली पद्धत वापरली जाईल.

असे म्हणतात की, मशीन बाटलीचे रुपांतर प्लास्टिकच्या फ्लेक्समध्ये करते. हे विभागासाठी फायदेशीर ठरेल. कारण यामुळे वर्षानुवर्षे वाजवी पैसे मिळतील. सध्याच्या योजनेत उल्लेख केला आहे की, पश्चिम रेल्वेच्या महामार्गात आणि गुजरातमधील काही स्थानकांवर सुमारे ३३ मशीन्स बसवण्यात येतील.

या योजनेत मरीन लाईन्स आणि बोईसर यांच्यातील काही स्थानके आणि बिलीमोरा, सूरत, उधना, उडवाडा, उमरगाव, वापी, वलसाड आणि नवसारी या स्थानकांचा समावेश आहे.

याबद्दल बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, कराराच्या आधारे अधिग्रहण करण्यात येणारी नवीन मशीन्स बसवण्याचा विभाग विचार केला जात आहे. जिथे खर्च कमी करणं आणि जाहिरातींद्वारे पैसे कमवणं हे उद्दीष्ट असेल. जाहिराती आणि प्लास्टिक फ्लेक्स विकून अशादोन्ही माध्यमातून महसूल मिळविला जाईल. ज्यायोगे पर्यावरणाचे बचत करण्याच्या उद्देशानं आणि विभागासाठी निधी तयार होईल.

सीएसआर क्रियाकलपाचा एक भाग म्हणून आतापर्यंत बऱ्याच स्थानकांवर १७ मशीन्स आधीच स्थापित केल्या गेल्या आहेत. याव्यतिरिक्त, जी जी अभियांत्रिकी लिमिटेडनं १६ स्थानकांवर मशीन्स देखील स्थापित केल्या आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याकडून मिड-डेला याची पुष्टी मिळाली आहे.

रेल्वे, २५ मशीन्सचा वापर करून, आतापर्यंत करारामधून १५ हजार आणि ८.७५ लाख इतका महसूल मिळवण्यात यशस्वी झाली आहे. दरम्यान, एकदा नवीन मशीन्स बसवल्यानंतर विभागाकडून परवाना शुल्कासाठी २६ हजार पेक्षा जास्त आणि बचतीतून १.१५ कोटीपेक्षा जास्त मिळण्याची अपेक्षा आहे.



हेही वाचा

मुंबईत धावणार इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया

वाढत्या कोरोनामुळं प्रवासी संघटनांची रेल्वे प्रशासनाकडं 'ही' मागणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा