Advertisement

Mumbai Rain Update: मुंबईसह ठाणे, पालघरसाठी IMD कडून रेड अलर्ट जारी

काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai Rain Update: मुंबईसह ठाणे, पालघरसाठी IMD कडून रेड अलर्ट जारी
SHARES

भारतीय हवामान विभागाने (IMD) उद्या, 8 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. यानुसार काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज 7 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय, IMD मुंबईचे जयंत सरकार म्हणाले की, मान्सूनच्या अनुकूल परिस्थितीमुळे गेल्या 3-4 दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात चांगला पाऊस झाला आहे. पुढील ४-५ दिवस अशीच स्थिती राहील.

अहवालात म्हटले आहे की, दक्षिण मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 82 मिमी पाऊस पडला, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात 109 मिमी आणि 106 मिमी पाऊस पडला.

तर, पालघरमध्ये गुरुवारी सकाळी 10 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत सरासरी 89.27 मिमी पाऊस पडला, तर वाडा तालुक्यात सर्वाधिक 135 मिमी पाऊस झाला.

याशिवाय, सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबईला पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गेल्या वर्षीच्या प्रमाणापेक्षा जास्त झाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा