नॅशनल पार्कचा ‘रॉयल’ हरपला

 Borivali
नॅशनल पार्कचा ‘रॉयल’ हरपला
नॅशनल पार्कचा ‘रॉयल’ हरपला
See all

बोरिवली - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या एकमेव रॉयल टायगर पलाश या 13 वर्षाच्या वाघाने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून पलाश रक्तदोष आणि मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालयतील डॉक्टर आणि उद्यानातील निवृत्त पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखीत त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. गेल्या सात ते आठ दिवसापासून त्याने खाणे-पिणे बंद केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी पलाशचे शवविच्छेदन करणार असल्याची माहीती व्याघ्रप्रकल्प अधिकारी शैलेश देवरे यांनी दिली.

7 एप्रिल 2006ला पलाशला भोपाळच्या वनविहारमधून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले. पलाशपासून बसंती वाघिणीने आनंद, यश या दोन वाघांना आणि लक्ष्मी या वाघिणीला जन्म दिला. हे सर्व आज संजय गांधी उद्यानातल्या टायगर सफारीत दाखल झालेत. बिग बी व्याघ्र प्रकल्पाचे अॅम्बेसिडर झाले तेव्हा त्यांनी नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारी केली होती, तेव्हा पलाशने त्यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. त्याच्या या करामतीमुळे खुद्द बीग बी देखील त्याच्या प्रेमात पडले होते.

Loading Comments