Advertisement

आता वाघ, सिंह आणि इतर प्राण्यांना घ्या दत्तक, SGNP ची नवी योजना

प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वनं आणि वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.

आता वाघ, सिंह आणि इतर प्राण्यांना घ्या दत्तक, SGNP ची नवी योजना
SHARES

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे वन्य प्राणी दत्तक योजना राबवण्यात येतं आहे. 

वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावं असं आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केलं आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी आहे.

संजय गांधी उद्यानात सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथं केली जाते. या प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वनं आणि वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.

वाघ घेण्यासाठी ३ लाख १० हजार, सिंह ३ लाख रुपये, बिबटे एक लाख २० हजार, वाघाटी ५० हजार, नीलगाय ३० हजार, चितळ २० हजार, भेकर १० हजार रुपयांना दत्तक घेता येईल.

संपूर्ण माहिती आणि आवेदन करण्याकरिता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा.

वन संरक्षक आणि संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २ अधिक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व), मुंबई.

ईमेल — lionsafaripark@gmail.com

भ्रमणध्वनी — ७०२०२८२७१४.

या योजनेंतर्गत, मागील वर्षी फक्त १६ जनावरांना दत्तक घेण्यात आलं. यासाठी एकूण १६.६ लाख रुपये खर्च आला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की एसएनजीपीमध्ये सिंह आणि वाघ हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहेत. या मोठ्या मांजरी कर्नाटकातील बॅनरघट्टा राष्ट्रीय उद्यान आणि मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्प यांच्यासह वेगवेगळ्या ठिकाणाहून आणल्या गेल्या.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार एसएनजीपी इथं बंदिवासात ठेवलेले बिबट्या २००३ ते २००५ दरम्यान मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागांतून पकडले गेले होते. वृद्धावस्थेमुळे आणि त्यांच्या गंभीर जखमांमुळे बिबट्यांना बंदिस्त ठेवलं आहे.हेही वाचा

पर्यावरण रक्षणासाठी मुंबई उच्चन्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, कामकाजासाठी वापरणार 'हे' कागद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा