Advertisement

नॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले

राज्यभर आता टप्प्या टप्प्याने अनलॉक होत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरळीत होतील. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी जाता येणार आहे.

नॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले
SHARES

राज्यभर आता टप्प्या टप्प्याने अनलॉक होत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरळीत होतील. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी जाता येणार आहे.

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १५ ऑक्टोबरपासून मॉर्निंग वॉकसाठी खुलं करण्यात आलं आहे. मॉर्निंग वॉकसाठी प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी सध्या फक्त पासधारकांना प्रवेश दिला जाणार आहे. सकाळी ५.३० ते सकाळी ७.३० या वेळेत प्रवेश दिला जाईल.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ६५ वर्षांवरील नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिला यांना प्रवेश देण्यात येणार नाही, असं उद्यान प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. प्रवेश देतानाही गटागटाने प्रवेश देण्यात येणार आहे. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना सध्या तुमणीपाड्याच्या गेटपर्यंतच जाता येईल.

सोमवारी उद्यानात प्रवेश दिला जाणार नाही. पास दिलेल्यांची तीन गटांत विभागणी केली आहे. दर दिवशी केवळ एकाच गटातील व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. गट ए मध्ये ए ते आय या अक्षराने सुरू होणारी नावे, गट बी मध्ये जे ते क्यू या अक्षराने सुरू होणारी नावे तर गट सी मध्ये आर ते झेड या अक्षराने सुरू होणारी नावे यांना प्रवेश दिला जाईल.



हेही वाचा- 

पुढील ३ महिने वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती, ‘बार्क’चा मोठा निर्णय

बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे  


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा