Advertisement

कांदिवलीतील 'या' कॉलेजनं कॅम्पसमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारले

याशिवाय कॉलेजमध्ये पूर्वीपासून जुन्या टायरपासून बनवलेले वर्टिकल गार्डन आहे. कॉलेज पर्यावरण पुरक उपाययोजनांना अधिक महत्त्व देते.

कांदिवलीतील 'या' कॉलेजनं कॅम्पसमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारले
(Representational Image)
SHARES

राज्याच्या पर्यावरणाला अनुसरून आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे आदेश दिले. त्यानुसार पहिल्यांदाच मुंबईतल्या कॉलेजमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे.

मुंबईतील कांदिवली (पश्चिम) परिसरातील एका कॉलेज कॅम्पसमध्ये आता इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन बसवले आहे. यावेळी पालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी उपस्थित होते.

या आठवड्याच्या सुरुवातीला कांदिवली एज्युकेशन सोसायटी (KES) बी के श्रॉफ कॉलेज ऑफ आर्ट्स आणि एम एच श्रॉफ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयातील चार्जिंग स्टेशनच्या उद्घाटनाला पालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशीही उपस्थित होते.

कॅम्पसमध्ये चार्जिंग स्टेशन असलेले हे कॉलेज शहरातील मोजक्या कॉलेजेसपैकी एक आहे, जे एकावेळी चार दुचाकी चार्ज करू शकते. तथापि, हा प्रयत्न दोन महिन्यांपूर्वी सुरू झाला आणि कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहे.

यासाठी कॉलेज प्रशासनानं सर्वप्रथम ११ हजार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाद्वारे कॉलेज कॅम्पसमध्ये चार्जिंग स्टेशन्सची गरज काय, अशी विचारणा विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. तथापि, त्यांना एकूण १,८०० प्रतिसाद मिळाले आहेत. कमीतकमी ४०० विद्यार्थ्यांनी लवकरच इलेक्ट्रिक टू-व्हीलर विकत घेण्याचा आपला मानस असल्याचं सांगितलं.

याशिवाय कॉलेजमध्ये पूर्वीपासून जुन्या टायरपासून बनवलेले वर्टिकल गार्डन आहे. महाविद्यालयानं सुमारे पाच वर्षांपासून इमारतीच्या छतावर सौर पॅनेल बसवले होते आणि त्यामुळे मासिक वीज बिल सुमारे ४७,००० रुपयांनी कमी झाले.



हेही वाचा

... म्हणून मुंबई विद्यापीठातील ५००० झाडांना बसवला क्यूआर कोड

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा