• जागतिक चिमणी दिनानिमित्त पोलिसांचा पुढाकार
SHARE

मुंबई - 20 मार्चला 'स्पॅरो डे'  साजरा केला गेला. अनेकांनी आपआपल्या पद्धतीने चिमण्यांच्या सुरक्षेसाठी तसंच त्यांचं जतन व्हावं या दृष्टीने आवाहन केलं. यात वर्सोवा पोलिसांनीही आपला सहभाग घेतला. वर्सोवा पोलिसांनी झाडांवर चिमण्यांसाठी 100 कृत्रिम घरटी तयार केली आहेत. 

तसंच त्या घरट्यात चिमण्यांसाठी पाणी- थोडा खाऊ अशी ही सोय केली आहे. वर्सोव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमण्यांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या