Advertisement

९३ वा दिवस सदस्यांसाठी ठरणार खास

बिग बॉसच्या घरात काल पत्रकार परिषद पार पडली. पत्रकारांच्या प्रश्नांना सदस्यांनी अपेक्षित उत्तरं दिली. आता मात्र बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांसाठी ९३ वा दिवस खास ठरणार आहे.

९३ वा दिवस सदस्यांसाठी ठरणार खास
SHARES

बिग बॉसच्या घरात काल पत्रकार परिषद पार पडली. पत्रकारांच्या प्रश्नांना सदस्यांनी अपेक्षित उत्तरं दिली. आता मात्र बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांसाठी ९३ वा दिवस खास ठरणार आहे. 


 सहा सदस्य फिनालेमध्ये

बिग बॉस मराठीचा सिझन दुसरा पहिल्या दिवसापासून चर्चेमध्ये राहिला आहे. मग तो टास्क असो, घरातील सदस्यांची भांडणं असोत, वा मैत्री असो... घरामध्ये आलेल्या सदस्यांपैकी सहा सदस्य आता फिनालेमध्ये पोहचले आहेत. आता तो क्षण जवळ आला आहे ज्या दिवसाचं स्वप्न सदस्यांनी घरामध्ये आल्यापासून पाहिलं. आजचा दिवस सदस्यांसाठी खास ठरणार आहे. कारण आज बिग बॉस सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची एव्ही दाखवणार आहेत. यामुळं प्रत्येकजण भावूक होणार हे निश्चित.


किशोरीताईंच्या डोळ्यात पाणी

साहसी, जिगरबाज, लढवय्या अशा विशेषणांनी ओळखली गेलेली व्यक्ती म्हणजे शिव ठाकरे या शब्दांत बिग बॉस यांनी शिवचं कौतुक केलं. बिग बॉसच्या घरात प्रथम प्रवेश केला एका ग्लॅमरस, उत्तम अभिनेत्रीनं, ती संवेदनशील, हरहुन्नरी व्यक्ति म्हणजेच किशोरी शहाणे. किशोरी शहाणे यांच्या प्रवासाबद्दल बिग बॉस बोलत असताना किशोरीताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. 'मूर्ति लहान पण कीर्ती महान' ही म्हण कोणाला लागू पडत असेल, तर ती नेहा शितोळेला. नेहाला देखील तिचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास बघायला मिळणार आहे. तिघेही सदस्य यादरम्यान खूप भावूक झाले, त्यांचा इतक्या दिवसांचा प्रवास त्यांच्या नजरेसमोरून गेला.हेही वाचा -

'व्हीआयपी गाढव'मध्ये भाऊसोबत शीतल

बोमन बनला क्रिकेटच्या मैदानावरील इंजीनियर
संबंधित विषय
Advertisement