संधी बेस्टचा इतिहास जाणून घेण्याची, बेस्ट दिनानिमित्त ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन

Prabhadevi
संधी बेस्टचा इतिहास जाणून घेण्याची, बेस्ट दिनानिमित्त ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन
संधी बेस्टचा इतिहास जाणून घेण्याची, बेस्ट दिनानिमित्त ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन
See all
मुंबई  -  

सद्यस्थितीत आर्थिक गाळात रुतलेल्या बेस्टकडे केविलवाण्या नजरेने पाहिले जात असले, तरी कधीकाळी प्रवाशांचे हक्काचे वाहन असलेल्या बेस्टचा मुंबईच्या रस्त्यांवर दबदबा होता.

नव्या पिढीला कदाचित या थाटाची कल्पना नसावी. त्यामुळे बेस्टच्या वैभवशाली इतिहासाचा मागोवा घेण्याची इच्छा असेल, तर येत्या रविवारी प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे अकादमीतील सभागृह जरूर गाठावे.


दोन दिवस सर्वांसाठी मोफत

बेस्ट दिनानिमित्त ६ ऑगस्ट रोजी बेस्टच्या एेतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन रवींद्र नाट्य मंदिर, पु. ल. देशपांडे अकादमी सभागृह येथे भरवण्यात येणार आहे. यंदाचा हा ७० वा बेस्ट दिन असणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन ६ आणि ७ ऑगस्ट असे दोन दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत असणार आहे.
काय असेल प्रदर्शनात?

या प्रदर्शनात पुरातन तिकीट, यंत्रे, वाहतूक विभागाची पुरातन बॅचेस, तिकीट पंच, बटन, शिट्टी, लाकडी तिकीट बॉक्स, ट्रामची लाकडी आसने, ट्रामचा रॉकेल दिवा, हॅंड सिग्नल, घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्रामची आणि दुमजली विजेवरील ट्रामची प्रतिकृती, बेस्टच्या दुमजली बसची मोठी प्रतिकृती, एकमजली आणि दुमजली ट्रामच्या मध्यम आकारातील लाकडी प्रतिकृती, निवडक बसथांब्याची प्रतिकृती इ. वस्तूंचा समावेश असेल.

यासोबतच नी. पेंडसे लिखित बेस्ट उपक्रमाची कथा या पुस्तकाची मराठी आणि इंग्लिश आवृत्ती सवलतीच्या दरात विक्रीसाठी असणार आहे. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता “बेस्ट कोण होतीस तू” या करमणुकच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.हे देखील वाचा -

बेस्टला वाचवण्यासाठी टीसीच वाटतायत पत्रकं!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.