Advertisement

बिग बॉसमध्ये सई, पुष्कर, स्मिता आणि शर्मिष्ठा!

पहिल्या सिझनमधील सई, पुष्कर, स्मिता आणि शर्मिष्ठा पुन्हा त्याच आठवणी, गप्पा, भांडणं, टास्क यांची आठवण करून देणार आहेत. घर तेच आहे, फक्त सदस्य वेगळे आहेत. ते दिवस पुन्हा एकदा त्यांना आठवणार आहेत.

बिग बॉसमध्ये सई, पुष्कर, स्मिता आणि शर्मिष्ठा!
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खास अतिथी येणार आहेत. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील सदस्य, त्यांची मैत्री, त्यांनी केलेले टास्क अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता त्याच पर्वातील काही सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत. पहिल्या सिझनमधील सई, पुष्कर, स्मिता आणि शर्मिष्ठा पुन्हा त्याच आठवणी, गप्पा, भांडणं, टास्क यांची आठवण करून देणार आहेत. घर तेच आहे, फक्त सदस्य वेगळे आहेत. ते दिवस पुन्हा एकदा त्यांना आठवणार आहेत. 


आईचा विसावा

घरामध्ये बिग बॉस सदस्यांना नवा टास्क देणार आहेत. या टास्कसाठीच पहिल्या पर्वाचे सदस्य घरामध्ये येणार आहेत. काल सगळे सदस्य बंद हॉटेलमध्ये अडकले होते आणि वेगवेगळी कार्य यशस्वीरीत्या पार पाडून सदस्यांनी या हॉटेलचा संपूर्ण ताबा मिळवला. आता हेच बंद पडलेलं 'बीबी हॉटेल' घरातील सदस्य पुन्हा नव्यानं सुरू करणार आहेत. या हॉटेलचं नाव सदस्यांनी 'आईचा विसावा' असं ठेवलं आहे. सदस्यांना घरात येऊन एक महिना लोटला आहे. बाहेरच्या जगाशी, बाहेरच्या माणसांशी, घटनांशी त्यांचा काहीच संबंध नाही. या टास्कमुळे घरातील सदस्यांना खास पाहुण्यांना भेटण्याची संधी मिळाली आहे. या सदस्यांचं घरातील सदस्य कशा प्रकारे स्वागत करतात ते पाहूया.


वैशाली - सुरेखा यांच्यात वाद

घरामध्ये सदस्यांचे वाद वाढत चालले आहेत. कधी कधी शुल्लक गोष्टीवरून हे सदस्य वाद करतात. एका सदस्याला चुकीचं दाखविण्यासाठी अथवा आपल्या टीममधील सदस्य कसा बरोबर आहे, त्याचं समर्थन करण्यसाठी सगळेच एकमेकांशी भांडायला लागतात. तसं बघायला गेलं तर सुरेखा यांचं इतर सदस्यांबरोबर वाद झालेले नाहीत. वीणा आणि अभिजीत बिचुकले सोडले तर तसा त्यांचा लक्षात राहील असा वाद वा भांडण क्वचितच आठवतं. कॅप्टनसीच्या टास्कमध्ये त्यांची नेहाबरोबर देखील थोडी बाचाबाची झाली.  आता मात्र बीबी हॉटेल या टास्कमध्ये वैशाली आणि सुरेखा यांच्यात वाद होणार आहे. 


 ही चोरी आहे

ज्यामध्ये वैशालीचे म्हणणं आहे की, सुरेखाताईनी तिनं ठेवलेली पपई घेतली. सुरेखा म्हणाल्या की, मी अर्धी घेतली तू अर्धी घे. त्यावर वैशाली म्हणाली की, मला अर्धी चालणार नाही. हे भांडण होत असताना नेहादेखील तिथं आली आणि तिनंही सुरेखा यांना सांगितलं कि, ती पपई आम्ही आधीच घेतली होती, तुम्हाला हवी होती तर आधी का नाही घेतली. नेहा आणि वैशाली दोघांनीही त्यांना पपई परत द्यायला सांगितली. त्यावर सुरेखा म्हणाल्या की, मी नाही देणार, तुम्हाला काय करायचं ते करा. त्यावर वैशाली म्हणाली की, ही चोरी आहे आणि मला हे मान्य नाही.हेही वाचा -

सूत्रसंचालिका बनून 'आऊट' करणार पर्ण पेठे

'टकाटक'ची तीन दिवसांत तीन कोटींहून अधिक कमाई
संबंधित विषय
Advertisement