Advertisement

बिग बॉसच्या घरात 'तहानलेला कावळा'

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना दिला जाणारा टास्क बऱ्याचदा दैनंदिन जीवनाशी निगडीत असतो. त्यामुळंच हे टास्क पार पाडायला सदस्यांना जसा हुरूप येतो तशीच मजा प्रेक्षकांनाही येते. आता बिग बॉसमध्ये 'तहानलेला कावळा' पहायला मिळणार आहे.

बिग बॉसच्या घरात 'तहानलेला कावळा'
SHARES

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना दिला जाणारा टास्क बऱ्याचदा दैनंदिन जीवनाशी निगडीत असतो. त्यामुळंच हे टास्क पार पाडायला सदस्यांना जसा हुरूप येतो तशीच मजा प्रेक्षकांनाही येते. आता बिग बॉसमध्ये 'तहानलेला कावळा' पहायला मिळणार आहे.

कॅप्टनसीची उमेदवारी

बिग बॉस यांनी सदस्यांवर एक कार्य सोपवलं आहे. ज्यानुसार त्यांना टॉप २ आणि बॉटम २ सदस्यांची नावं द्यायची होती. ज्यांना कॅप्टनसीची उमेदवारी मिळणार होती. सदस्यांनी टॉप २ मधील फक्त एकाच सदस्याचं नाव दिलं ते म्हणजे अभिजीत केळकर. दुसरं नाव बिग बॉस यांनीच सांगितलं, जे सदस्यांनीच चर्चेमध्ये घेतलं होतं आरोह वेलणकर. त्यामुळं आता अभिजीत आणि आरोहमध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. आता बघूया या टास्कमध्ये कोणता ग्रुप शक्ति पेक्षा युक्ति वापरुन विजयी होतो. आरोहच्या टीममध्ये शिवानी, अभिजीत बिचुकले, वीणा आणि नेहा असणार आहेत, तर अभिजीत केळकरच्या टीममध्ये किशोरी, रूपाली, शिव आणि हीना आहेत.

कॅप्टन्सी कार्य

रांझणातील तळाला गेलेलं पाणी वरती यावं यासाठी शक्तीऐवजी युक्ती वापरून कावळा खडे टाकून पाणी प्यायला होता. कॅप्टन्सीची संधी आज तळाला गेलेल्या पाण्यासारखी आहे. जी सदस्यांना खडे टाकून वर आणायची आहे. यासाठी बिग बॉस सदस्यांवर तहानलेले कावळा हे कॅप्टन्सी कार्य सोपवणार आहेत. प्रत्येक टीमनं आपआपल्या जबाबदार्‍या वाटून घेतल्या आहेत. पण टास्क म्हटला की वाद होतोच. त्याप्रमाणं या कार्यादरम्यानही काही वाद होतो का ते पहायचं आहे.

नियमांचं उल्लंघन

तहानलेला कावळा हे कॅप्टनसी कार्य सोपवताना बिग बॉस यांनी कार्यासंबंधातले काही नियम आखून दिले आहेत. ज्यांचं उल्लंघन टास्क दरम्यान कोणीच करू शकत नाही. बिग बॉसचे नियम सगळ्या सदस्याना पाळणं बंधनकारक असतं, पण शिव आणि विणाकडून महत्वाच्या नियमांचं उल्लंघन या कार्यादरम्यान होणार आहे. बिग बॉस सगळ्या सदस्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत की, कार्या दरम्यान दिलेल्या सामुग्रीचा फक्त कार्यातच वापर करायचा आहे, पण यादरम्यान शिव आणि विणा यांनी कार्यासाठी दिलेल्या खड्यांचा वैयक्तिक भावना प्रदर्शित करण्यासाठी वापर केला. त्यामुळं शिक्षा म्हणून शिव आणि विणा यांनी रांझणातील खडया व्यतिरिक्त गार्डन, जीम आणि स्वीमिंग पूलमध्ये पडलेले सर्व खडे दोन्ही टीम्सच्या टोपलीत जसे होते तसे समान पातळीवर जमा करायचे आहेत.हेही वाचा -

CCD चे संस्थापक सिद्धार्थ बेपत्ता, ३० हजार जणांच्या रोजगारावर कुऱ्हाड?

ही बघा! चुनाभट्टीतील मोडकळीस आलेल्या इमारतीतल्या रहिवाशांची जगण्यासाठीची कसरतसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा