बिग बॉसच्या घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन!

आजवर आपण बिग बॉसच्या घरातील भांडणं आणि वादविवाद पहात आलो आहोत, पण आता प्रेक्षकांना या घरातील गोड क्षणही अनुभवायला मिळणार आहेत. त्याचीच ही एक झलक...

  • बिग बॉसच्या घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन!
  • बिग बॉसच्या घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन!
  • बिग बॉसच्या घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन!
  • बिग बॉसच्या घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन!
SHARE

आजवर आपण बिग बॉसच्या घरातील भांडणं आणि वादविवाद पहात आलो आहोत, पण आता प्रेक्षकांना या घरातील गोड क्षणही अनुभवायला मिळणार आहेत. त्याचीच ही एक झलक...

वाढदिवस सर्वांसाठीच खूप खास असतो. बिग बॉसच्या घरातील सर्वात चर्चेत असलेल्या सदस्यांपैकी एक असलेली आणि फिनालेमध्ये पोहोचलेल्या शिवानी सुर्वेचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. शिवानीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी घरातील सदस्यांनी जय्यत तयारी देखील केली. 

फिनालेमध्ये पोहोचलेल्या सहा सदस्यांमध्ये घरामध्ये सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या किशोरी शहाणे यांनी शिवानीचं औक्षण केलं आणि केक कटींग देखील झालं. सगळ्यांनी मिळून छान केक तयार केला होता. शिवानीसाठी खास स्वयंपाक देखील बनवला होता.

बिग बॉसच्या घरातील वातावरण आता पार निवळलं आहे. सारं काही पार पडलं आहे. गेम ओव्हर होत आल्यानं प्रत्येक सदस्य या घरातील गोड आठवणी उराशी बांधून घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. शिवानीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन हे त्याचंच उदाहरण असल्याचं म्हणायला हरकत नाही.

वादविवाद, भांडण, तंटे, हाणामाऱ्या, टास्क, नॅामिनेशन्स या पलीकडे जाऊन आता बिग बॉसच्या घरात एक फ्रेंडली वातावरण तयार झालं आहे. प्रत्येकानं आपापली खेळी खेळली आहे. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. त्यामुळं निकालाचं टेन्शन न घेता घरातील सदस्य उरलेले क्षण छान एन्जॅाय करत आहेत.हेही वाचा -

पुन्हा शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर

'विष'मधून अभिनयात एंट्री करणार जसलीन मठरु
संबंधित विषय
ताज्या बातम्या