Advertisement

बाबूजींचं 'गीतरामायण' हिंदीत

बाबूजी म्हणजेच दिवंगत संगीतकार सुधीर फडके यांच्या संगीतानं सजलेल्या आणि गदिमांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'गीतरामायणा'वर सर्व मराठी रसिकांनी मनापासून प्रेम केलं आहे. आता या गीतरामायणाची मैफल हिंदीमध्ये रंगणार आहे.

बाबूजींचं 'गीतरामायण' हिंदीत
SHARES

बाबूजी म्हणजेच दिवंगत संगीतकार सुधीर फडके यांच्या संगीतानं सजलेल्या आणि गदिमांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'गीतरामायणा'वर सर्व मराठी रसिकांनी मनापासून प्रेम केलं आहे. आता या गीतरामायणाची मैफल हिंदीमध्ये रंगणार आहे.


दिग्गजांच्या प्रतिभेचा अविष्कार

गदिमा आणि बाबूजींच्या पश्चात काही वर्षांपूर्वी मुंबईत पुन्हा एकदा गीतरामायण सादर करण्यात आलं होतं, पण आता थेट हिंदी भाषेत झेप घेत गीतरामायणानं एक वेगळाच प्रवास सुरू केला आहे. शब्दप्रभू 'गदिमा' म्हणजेच ग. दि. माडगूळकर आणि दिवंगत संगीतकार सुधीर फडके या दोन दिग्गजांच्या प्रतिभेचा सर्वांगसुंदर अविष्कार म्हणजे 'गीतरामायण'. आजवर देश-परदेशात गीतरामायणाचे अनेक कार्यक्रम झाले व या कार्यक्रमांना रसिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मराठी माणसाच्या सांस्कृतीक जीवनाचं वैभव असलेल्या गीतरामायणाच्या हिंदी रूपातील सांगीतिक मैफिलीचा आनंद घेण्याची संधी लवकरच रसिकांना उपलब्ध होणार आहे.


लोकार्पण सोहळा

हिंदी गीतरामायण प्रकाशन समितीच्या सौजन्यानं गीतरामायणावर आधारित सुनील सुधाकर देशपांडे रचित 'संगीत रामायण' या भावानुवादाचा लोकार्पण सोहळा रविवार २५ ऑगस्ट रोजी सायं. ५.३० वा. प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. आचार्य सूर्यप्रकाश दीक्षित (पूर्व हिंदी विभागप्रमुख, लखनऊ विश्वविद्यालय), आनंद माडगूळकर (कार्यकारी विश्वस्त, ग. दि. माडगूळकर प्रतिष्ठान), शीतला प्रसाद दुबे, (अध्यक्ष हिंदी साहित्य अकादमी, मुंबई विभाग), सुंदरचंदजी ठाकूर (संपादक नवभारत टाइम्स) आदी मान्यवर या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत. या सोहळ्यानंतर सुप्रसिद्ध गायिका-संगीतकार आशा खाडिलकर यांच्या संगीत संयोजनांतर्गत संगीत रामायणातील काही निवडक गाणी सादर केली जातील.


गीतांचा सुश्राव्य आनंद

रसिकांना अभिमान वाटावा अशा मराठी भाषेतील वाङ्मयीन व सांगितिक अशा ज्या निवडक कलाकृती आहेत, त्यात गीतरामायण अग्रस्थानी आहे. या गीतांचा सुश्राव्य आनंद हिंदी भाषेमध्येही अनुभवायला  मिळावा या उद्देशानं 'संगीत रामायण' या कार्यक्रमाची संकल्पना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं रचनाकार सुनील देशपांडे यांचं म्हणणं आहे. जीवनमूल्यांची ओळख करून देणारा गीतरामायणाचा हा ठेवा इतर भाषिक लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न रसिकांना वेगळी अनुभूती देणारा असेल हे नक्की.



हेही वाचा  -

’मीडियम स्पाइसी’साठी एकत्र आले नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी

सलमाननं शिवानीला दिला कोणता सल्ला?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा