सलमाननं शिवानीला दिला कोणता सल्ला?

हिंदीतल्या बिग बॉसमध्ये सूत्रसंचालक बनून घरातील सदस्यांना आपल्या खास शैलीत नार्मल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सलमान खाननं मराठी बिग बॉसच्या घरातील शिवानी सुर्वेला मोलाचे चार शब्द सांगितले आहेत.

SHARE

हिंदीतल्या बिग बॉसमध्ये सूत्रसंचालक बनून घरातील सदस्यांना आपल्या खास शैलीत नाॅर्मल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सलमान खाननं मराठी बिग बॉसच्या घरातील शिवानी सुर्वेला मोलाचे चार शब्द सांगितले आहेत.


सुखद आश्चर्याचा धक्का

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात विकेन्डला सर्वांना एक छान सरप्राइज मिळालं. बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानची चक्क विकेन्डला शोमध्ये एन्ट्री झाली. सहानपणापासून सलमान खानची चाहती असलेल्या शिवानी सुर्वेसाठी तर सलमानला याची देही याची डोळा पाहणं आणि त्याच्यासोबत बातचीत करायला मिळणं हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. महेश मांजरेकरांनी शिवानीचा परिचय करून देताना, ‘अँग्री यंग वुमन’ असा करून दिला. म्हणूनच सलमान खानला शोमध्ये आलेलं पाहून शिवानीनं मांजरेकरांना प्रश्नही विचारला की, सर, हे स्वप्न आहे, की सत्य हेच मला समजत नाही.


मी सलमानचा डुप्लिकेट 

सलमाननंही आपल्या चाहतीची थट्टा-मस्करी करायला सुरूवात केली. सलमान म्हणाला की, हो मी सलमानचा डुप्लिकेट आहे. खरं तर, मी तुला माझ्या एका फिल्ममध्ये घेणार होतो, पण तू बिग बॉसच्या घरात आहेस. तुला जर फिल्म करायची असेल, तर एक पर्याय आहे. तिथे कुणाला तरी थप्पड मारून निघून ये. नियमांचं उल्लंघन करून टाक. सलमाननं दिलेला सल्ला शिवानी खरोखर अंमलात आणते का ते पहायचं आहे.


शिवानीनं केला डान्स 

शिवानीनं यावेळी आठवणी सांगितल्या की, पूर्वी सलमान खानच्या घराखाली जाऊन मी अनेकदा ‘जानम समझा करो’ चित्रपटातलं मधलं ‘जिद ना करो जरा समझा करो…’ हे गाणं गायचे. यावेळी शिवानीनं सलमानसमोर त्याच्याच ‘मुझसे शादी करोगे’ या सिनेमातलं ‘जिने के है चार दिन…’ या गाण्यावर डान्स करून सलमानची वाहवाही घेतली.हेही वाचा -

संजय मिश्रा म्हणतात 'बहुत हुआ सम्मान'

'बॉइज'नंतर 'गर्ल्स' करणार धमाल!
संबंधित विषय
ताज्या बातम्या