Advertisement

'बॉइज'नंतर 'गर्ल्स' करणार धमाल!

'बॉइज' आणि 'बॉइज २' या दोन चित्रपटांच्या भरघोस यशानंतर विशाल देवरुखकर आता 'गर्ल्स'च्या रूपात मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची सफर घडवणार आहेत.

'बॉइज'नंतर 'गर्ल्स' करणार धमाल!
SHARES

'बॉइज' आणि 'बॉइज २' या दोन चित्रपटांच्या भरघोस यशानंतर विशाल देवरुखकर आता  'गर्ल्स'च्या रूपात मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची सफर घडवणार आहेत. 


तरुणींच्या जगाची सफर 

मराठी चित्रपटांमध्ये मुलांवर आधारित, त्यांच्या शाळा, कॉलेज जीवनावर आधारित बरेच सिनेमे येऊन गेले आहेत. मात्र, मुलींवर आधारित, त्यांच्या मजा-मस्तीवर आधारित चित्रपट फारसे चित्रपट आलेले नाहीत. हीच उणीव भरून काढण्यासाठी दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी 'गर्ल्स' हा चित्रपट बनवला आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि  कायरा कुमार क्रिएशनस प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट तरुणींच्या एका अनोख्या जगाची सफर घडवणार आहे.


मुलांपेक्षा जास्त मजा

'बॉइज' आणि 'बॉइज २'नंतर 'गर्ल्स'मध्ये प्रेक्षकांना काय पहायला मिळणार याचा खुलासा विशाल यांनी केला आहे. 'गर्ल्स'बाबत ते म्हणाले की, असं म्हणतात मुलांसारख्या मुली कधीच एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी असू शकत नाहीत. मात्र हे साफ चुकीचं आहे. मुलींसारखी मैत्री आणि त्या मैत्रीत होणारी धमाल ही कुठेच पाहायला मिळत नाही. 'व्हाय शूड बॉइज हॅव ऑल द फन' या वाक्याला  मात देत, मुली सुद्धा मुलांएवढीच किंवा मुलांपेक्षा जास्त मजा करू शकतात हा 'गर्ल्स' या चित्रपटाचा गाभा आहे.


मुलींच्या भावविश्वाचं दर्शन

'गर्ल्स' हा चित्रपट मुलींच्या भावविश्वाचं दर्शन घडवणारा असेलच, पण त्यासोबत त्यांच्याविषयीच्या बऱ्याच मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा असल्याचं सांगत विशाल म्हणाले की, मुलींमध्ये होणारं संभाषण, त्यांच्यात होणारे किस्से हे फक्त मुली स्वतः पुरत्याच ठेवतात. बऱ्याच लोकांना त्यांच्या या विश्वाबद्द्ल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. याच उत्सुकतेचं उत्तर 'गर्ल्स' या चित्रपटातून मिळणार आहे. 'गर्ल्स' हा चित्रपट तरुणींच्या अवतीभवती फिरणारा आणि त्यांचे भावविश्व उलगडणारा आहे.


१५ नोव्हेंबरला प्रदर्शित

'गर्ल्स' या चित्रपटात नेमकं काय दाखवण्यात आलं आहे? या आणि यांसारख्या काही प्रश्नांच्या उत्तरासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. एकविसाव्या शतकात चौकटीबाहेर जाऊन आयुष्य जगणाऱ्या आजच्या काळातील मुलींचं विश्व, त्यांची मजामस्ती याचं चित्रण 'गर्ल्स' या चित्रपटात पहायला मिळणार आहे.



हेही वाचा -

ऋतिक-टागयरमध्ये होणार 'वॅार'

'तेजाज्ञा'ची सणासुदीसाठी खास भेट

आता बस्स… बस्स…



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा