Advertisement

’मीडियम स्पाइसी’साठी एकत्र आले नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी

काही कलाकारांची कारकीर्द समांतर रेषेत सुरू असते, पण त्यांना कधीच एकत्र काम करण्याची संधी मिळत नाही. ‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटानं नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी या दोन दिग्गजांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे.

’मीडियम स्पाइसी’साठी एकत्र आले नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी
SHARES

काही कलाकारांची कारकीर्द समांतर रेषेत सुरू असते, पण त्यांना कधीच एकत्र काम करण्याची संधी मिळत नाही. ‘मीडियम स्पाइसी’ या मराठी चित्रपटानं नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी या दोन दिग्गजांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे.

लॅन्डमार्क फिल्म्सची निर्मिती

मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नीना कुलकर्णी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. नीना यांनी नेहमीच विविध कॅरेक्टर्सच्या माध्यमातून प्रेक्षकांवर आपला ठसा उमटवला आहे. रवींद्र मंकणी यांनी छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखांचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. असे हे दोन दिग्गज कलाकार लॅन्डमार्क फिल्म्सची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या, मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

नातेसंबंधांवर भाष्य

 आजवर काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले हे जेष्ठ कलाकार नव्या पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे आणि ललित प्रभाकर हे प्रमुख भूमिकेत असून, सागर देशमुख, नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी यांची साथ त्यांना लाभली आहे. आजवर मराठी रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मोहित टाकळकर यांचा दिग्दर्शक म्हणून ‘मीडियम स्पाइसी’ हा पहिलाच चित्रपट आहे.हेही वाचा -

संजय मिश्रा म्हणतात 'बहुत हुआ सम्मान'

'बॉइज'नंतर 'गर्ल्स' करणार धमालसंबंधित विषय
Advertisement