Advertisement

'विराट' इतिहास!


SHARES

मुंबई- आयएनएस विराट. नावाप्रमाणेच महाकाय. शत्रूला धडकी भरवणारी शस्त्रसज्जता. जगातील सर्वात अधिक काळ सेवेत असण्याचा विश्वविक्रम ज्या युद्धनौकेच्या नावावर आहे ती म्हणजे भारताची आयएनएस विराट. लवकरच विराट भारतीय नौदलातून डिकमिशन्ड अर्थात निवृत्त होणार आहे. सहा मार्चला विराटच्या प्रदीर्घ सेवेला पूर्ण विराम लागेल. भारतीय नौदलात आयएनएस विक्रांतसारखाच आयएनएस विराटचा देखील दरारा आहे.

1959 मध्ये आयएनएस विराट ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये एचएमएस हार्मिस नावाने दाखल झाली. रॉयल नेव्हीची 27 वर्ष सेवा केल्यानंतर ही युद्धनौका 1987 मध्ये आयएनएस विराट भारतीय नौदलात सामील झाली. ओपरेशन ज्युपिटर आणि ऑपरेशन पराक्रम अशा मोठ्या मोहीमा या युद्धनौकेनं मोठ्या हिकमतीनं पार पाडल्या. 2001 मध्ये दहशतवाद्यांनी संसदेला लक्ष केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. त्यावेळी संपूर्ण वेस्टर्न नेव्हल कमांडचं नेतृत्व आयएनएस विराटनं केलं होतं.

६५ वर्ष झाली. पण अजूनही तिचा डौल कायम आहे. त्यामुळे विराटला भंगारात काढण्याऐवजी तिचं संग्रहालयात रूपांतर करावं अशी मागणी होत होती. आंध्र प्रदेश सरकारने तशी तयारीही दाखवली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा