ग्राहक जागृतीसाठी 'प्रयास'चा प्रयास

 Mumbai
ग्राहक जागृतीसाठी 'प्रयास'चा प्रयास

दादर - दादर रेल्वे स्थानकावर बुधवारी प्रयास सेवाभावी संस्थेतर्फे जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांचे हक्क आणि अधिकार यावर जनजागृती करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी समाजात विक्रेत्यांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक आणि ग्राहकांचे कायद्यानुसार असलेले हक्क यावर जनजागृती केली. 

लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हायला हवी. सर्वसामानांच्या कष्टाच्या पैशाचा सुयोग्य वापर झाला पाहिजे यासाठी जागतिक ग्राहक दिनानिमित्त रेल्वे स्थानका बाहेर आम्ही फलकाद्वारे मूक जनजागृती करत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रयासचे सचिव रोहित ढाले यांनी दिली.

या वेळी रेल्वे स्थानकावर लोकांना त्रास होऊ नये याकरता रेल्वे स्थानकाबाहेर उभे राहून कोणत्याही घोषणा न देता पोस्टर द्वारे या विद्यार्थ्यांनी ग्राहक जनजागृतीचा संदेश दिला.

Loading Comments