Advertisement

कपिलने घडवली भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती - सुनील गावस्कर


कपिलने घडवली भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती - सुनील गावस्कर
SHARES

भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलण्यात कपिल देवचं मोठं योगदान आहे. क्रिकेट हा खेळ फक्त मोठ्या शहरातील खेळाडूंसाठी मर्यादित खेळ नाही, असा विश्वास कपिलने लहान शहरातील तरूण खेळाडूंना दिला. आपणही भारतीय क्रिकेट टीमचा सदस्य होऊ शकतो, अशी जिद्द या तरूणांमध्ये निर्माण झाल्यानेच भारतीय क्रिकेटचं रुपडं बदललं, असं मत लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं. ते सोमवारी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या 'डेमाॅक्रॉसी इलेव्हन' पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

हा प्रकाशन सोहळा माधव आपटे, नरी काॅन्ट्रॅक्टर, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, दिवंगत क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या पत्नी नंदिनी आणि क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत झाला.

यावेळी हर्षा भोगले, गावस्कर, तेंडुलकर आणि दिलीप सरदेसाई यांनी क्रिकेट विश्वातील जुन्या आठवणींना उजाळा देत भारतीय संघाचा आधुनिक चेहरा आणि खेळाडूंची बदललेली मानसिकता यावर चर्चा केली.


योगदान महत्त्वाचं

गावस्कर म्हणाले, पूर्वी मोठ्या शहरातील खेळाडू क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत होते. पण कपिलने हे चित्र बदलत नवी क्रांती घडवली. कपिलचं भारतीय क्रिकेटमधील योगदान महत्त्वाचं आहे.


विराटचा जोश जमेची बाजू

तर, 'आयपीएल'च्या व्यासपीठाचा तरूण खेळाडूंना खूप फायदा होत आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीकडे लक्ष दिलं जात आहे. भारतीय टीमची फलंदाजी आणि गोलंदाजी बहरत आहे. हार्दिक पंड्या सारखा उमदा खेळाडू आपल्याला आयपीएलमधूनच गवसला. सुरूवातीला विराटचा जोश टीकाकारांना पसंत नव्हता, पण आता हाच जोश भारतीय संघाची मजबूत बाजू बनली आहे, असंही तेंडुलकर म्हणाला.



हेही वाचा -

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी मुंबईकर श्रेयसची निवड


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा