Advertisement

'घाडगे अँड सून' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

मालिकेत अमृताची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी भाग्यश्री लिमयेनं इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'घाडगे अँड सून' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
SHARES

मराठी टिव्ही क्षेत्रातील 'घाडगे अँड सून' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेनं ५०० भागांचा टप्पा पार केला असून हा आठवडा मालिकेचा शेवटचा आठवडा असणार आहे.

उत्तम कथा आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेत अमृताची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी भाग्यश्री लिमयेनं इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी तिनं आभार मानले आहेत.

मालिका निरोप घेत असल्यानं सगळ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर भावना शेअर केल्या आहेत. माईच्या भूमिकेत सुकन्या कुलकर्णीला देखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या मालिकेत अक्षय-अमृताची केमिस्ट्रीची तसेच कियारा आणि वसुधा या दोघींची खलनायिकेच्या भूमिकेचंही कौतुक झालं होतं.हेही वाचा

९ वर्षांनंतर झी मराठीवर पुन्हा येतोय 'हा' कार्यक्रम

अरुण गवळीची मुलगी 'ह्या' अभिनेत्याशी करणार लग्न

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा