'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेची चतुर्थशतक पूर्ती!

छोट्या पडद्यावरील काही मालिका इतक्या लोकप्रिय होतात की वाहिन्या आणि प्रॅाडक्शन हाऊसेसही त्यांच्या प्रेमात पडतात. अशा मालिकांची मग एका मागोमाग एक विक्रम करत शतकी वाटचाल सुरू होते. 'राधा प्रेम रंगी रंगली' या मराठी मालिकेनेही नुकताच ४०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे.

  • 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेची चतुर्थशतक पूर्ती!
SHARE

छोट्या पडद्यावरील काही मालिका इतक्या लोकप्रिय होतात की, वाहिनीसोबत आणि प्रॅाडक्शन हाऊसही त्यांच्या प्रेमात पडतं. अशा मालिकांची मग एका मागोमाग एक विक्रम करत शतकी वाटचाल सुरू होते. 'राधा प्रेम रंगी रंगली' या मराठी मालिकेनंही नुकताच ४०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे.


४०० भागांची मालिका

कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांचा अभिनय, मालिकेमध्ये घडणाऱ्या घटना, राधाचं तिच्या माणसांवर आणि प्रेमवर असलेलं निस्वार्थ प्रेम, तिनं कुटुंबियांसाठी आणि प्रेमासाठी केलेला त्याग, देवयानी–दीपिकाच्या प्रत्येक कारस्थानाला तिचं खंबीरपणे सामोरं जाणं, परिवाराला प्रत्येक संकटापासून वाचवणं हे सगळंच प्रेक्षकांना आवडत आहे. या प्रेमामुळेच 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिका ४०० भागांची झाली आहे.
आनंदाचं सेलिब्रेशन

मालिकेनं ४०० भागांचा पल्ला गाठल्याचा आनंद कलाकार-तंत्रज्ञांनी सेटवर केक कापून साजरा केला. यासोबतच सोशल मिडीयावरही याचं सेलिब्रेशन करण्यात आलं. आगामी काही भागांमध्ये या मालिकेत रंजक घटना घडणार आहेत. या मालिकेमध्ये आजवर घडलेल्या घटनांनी प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचं काम केलं आहे. राधा आणि प्रेमचं लग्न, त्यांच्या प्रेमाची सुरुवात, राधाचं अचानक प्रेमच्या आयुष्यामधून निघून जाणं, राधाचं प्रेमा म्हणून मालिकेमध्ये येणं, दीपिका आणि देवयानीचा राधाला प्रेमच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न, राधा–प्रेम विरोधात रचलेलं कारस्थान, दीपिकानं खोट्याचा आधार घेऊन प्रेमला आपलसं करण्याचा केलेला प्रयत्न... हे सगळं राधाने मोठ्या धीरानं सहन केलं. प्रत्येक कठीण प्रसंगाला ती मोठ्या हिंमतीनं सामोरी गेली. राधा दीपिकाच्या विरोधात ठामपणे आणि खंबीरपणे उभी राहिली. आता मात्र पुन्हा राधा आणि प्रेमच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागणार आहे. राधा गरोदर असल्याची गोड बातमी तिने प्रेमला आणि घरच्यांना सांगितली असून सगळेच खूप आनंदी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ही मालिका एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.हेही वाचा -

EXCLUSIVE : अण्णांची 'शेवंता' हा तरी कोण?

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ऑनलाइन समुपदेशकसंबंधित विषय
ताज्या बातम्या